महाराष्ट्र

६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गुणगौरव

६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गुणगौरव

कोकमठाण (कोपरगाव ) सांगली येथील शांतीनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात भरलेल्या शासकीय ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि उद्योग व सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत कला प्रदर्शनाचे उ‌द्घाटन झाले असून यावेळी राज्यभरातील गुणवंत बालकलाकारांचा तसेच कला महाविद्यालयातील कलावंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

राज्यात नव्या बदलांसह संपन्न झालेल्या शासकीय बाल चित्रकला स्पर्धेत तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून चौथ्या गटात प्रथम क्रमांक पटकावणारा आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाचा विद्यार्थी चि. अभिमन्यू मारणे याला सन्मानपत्र व १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान कला संचालनालयाचे संचालक किशोर इंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवणारी कु. साक्षी गायकवाड हिला शासकीय गुणवत्ता प्रशस्तीपत्र व ५ हजार रुपये पारितोषिक कलाशिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सोहळ्यास विद्यार्थ्यांचे पालक, मित्रपरिवार तसेच राज्यातील विविध कला महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि कला क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले की”राज्यस्तरीय कला स्पर्धा व शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत एका शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी स्थान प्राप्त करण्याच्या यशामुळे आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाचा गौरव वाढला आहे. राज्यस्तरीय कला प्रदर्शनात मिळवलेल्या या सन्मानामुळे आत्मा मालिक गुरुकुलाने कला क्षेत्रातील आपली गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे.”आत्मा मालिक पॅटर्न चे हे यश असून त्या अंतर्गत अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, जादा तयारी वर्गाचे आयोजन, नैदानिक चाचण्या, सराव परीक्षा, विद्यार्थी व शिक्षकांची मेहनत यामुळे हे यश साकारले असे ते म्हणाले .या यशामागे आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे तसेच सर्व विभाग प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन तर कलाशिक्षक मंगेश रहाणे, अविनाश चौधरी, सुमित मोरे, प्रसाद करडे यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे सर यांच्यासह सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे