महाराष्ट्र

दर्डे कोराळे येथे शिवजयंती निमित्त प्रफुल्ल खपके यांचे व्याख्यान संपन्न;

दर्डे कोराळे येथे शिवजयंती निमित्त प्रफुल्ल खपके यांचे व्याख्यान संपन्न

 

दर्डे कोराळे: येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती,  यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ‘शिवजयंती उत्सव सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी    युवकांनी शिवविचारांचा वारसा जोपासावा असे आवाहन व्याख्याते प्रफुल्लजी खपके यांनी केले आहे दर्डे कोराळे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, दर्डे कोराळे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ‘शिवजयंती उत्सव सोहळ्याचे’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून प्रसिद्ध व्याख्याते प्रफुल्लजी खपके यांचे “छत्रपती शिवाजी महाराज: युवकांचे प्रेरणास्थान” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाचे आयोजन भरत सोनवणे आणि शरद दुबे यांच्या विशेष प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून करण्यात आले होते.व्याख्यान देताना प्रफुल्ल खपके यांनी शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यापासून ते त्यांच्या नैतिक मूल्यांपर्यंत विविध पैलूंवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “शिवाजी महाराज केवळ इतिहासातील राजा नसून, ते आजच्या युगातील तरुणांसाठी उत्तम मार्गदर्शक आहेत. युवकांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून शिवरायांचा स्वाभिमान आणि जिद्द अंगी बाळगायला हवी.”शिवजयंती निमित्त केवळ व्याख्यानच नव्हे, तर महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ खेळ पैठणीचा आणि ‘जिजाऊंच्या लेकींचा सन्मान’ अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या सोहळ्याला सार्वजनिक शिवजयंती समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचलन रवींद्र शिंदे सर यांनी सांभाळले.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे