आरोग्य व शिक्षण

कोपरगाव पालिकेच्या सुस्त कारभारामुळे नागरिक डासांच्या विळख्यात शहरात तातडीने फवारणी करा – नगरसेवक जनार्दन कदम

कोपरगाव पालिकेच्या सुस्त कारभारामुळे नागरिक डासांच्या विळख्यात शहरात तातडीने फवारणी करा – नगरसेवक जनार्दन कदम

कोपरगाव-    कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत सध्या डासांचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नये शहरात तातडीने औषध फवारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून कोपरगाव शहरात डासांची संख्या वाढली आहे. सायंकाळ होताच शहरात डासांचा इतका प्रादुर्भाव वाढला आहे की नागरिकांना असह्य होत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे वेळीच डासांवर उपाय योजना केल्या नाही तर काही दिवसांत शहरात विविध आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येईल. शहरातील स्वच्छता आणि आरोग्य ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र सध्या प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून औषध फवारणी किंवा धुरीकरण करण्यात आलेले नाही.

नगरपरिषदेकडे औषध फवारणीसाठी यंत्रणा उपलब्ध असतानाही ती का वापरली जात नाही? नागरिकांकडून आरोग्य कर वसूल केला जातो मग त्यांना सुविधा का दिल्या जात नाहीत असा संतप्त प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने संपूर्ण शहरात औषध फवारणी सुरू करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे