महाराष्ट्र

शंभू गर्जना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जेऊर कुंभारी ग्रामस्थांनी केला विवेक कोल्हे यांचा सत्कार

कोरोना महामारीची काळात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन विवेक कोल्हे यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने दिला जाणारा शंभूगर्जना पुरस्कार जाहीर झाला असुन ११ मार्च २०२२ रोजी बलिदान स्मृतीदिना चे औचित्य साधुन किल्ले धर्मवीरगड ( बहादुर गड )तालुका श्रीगोंदा येथे हा पुरस्कार देऊन विवेक कोल्हे यांचा गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्ताने
दि.७ मार्च रोजी सायंकाळी जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच जालिंदर चव्हाण माजी संचालक बाळासाहेब चव्हाण भाजपा युवा मोर्चा उपाअध्यक्ष सुधाकर,वक्ते यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जेऊर कुंभारीचे उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी बोलतांना असे सांगितले की समाजीक क्षेत्रात विवेक कोल्हे यांचे कार्य उल्लेखनिय आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जगावर थैमान घातले रूग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते अशा परिस्थितीत माजी मंत्री शंकरराव कोल्हे ,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजवनी उद्योग समुहेचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भैय्या कोल्हे यांनी एस एस जी एम काॅलेज,आत्मा मालिक कोविड सेंटर जनतेसाठी उपलब्ध करून दिले तसेच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला तेव्हा आत्मा मालिक कोविड
सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून दिली अशा परिस्थितीत विवेक कोल्हे यांनी केलेले काम सर्व जनतेच्या अविस्मरणीय राहील असे प्रतिपादन जेऊर कुंभारी चे उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी केले ते पुढे म्हणाले कि विवेक भैय्या यांच्या दूरदृष्टीतून तरुणांना एकत्र आणण्याचे कौशल्य असुन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करतात. विवेक कोल्हे यांचा सत्कार करण्यातसाठी जेऊर कुंभारी गावातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.सत्कार प्रसंगी विजय शिंदे, पोपट शिंदे, गिरीधर गुरसळ, रावसाहेब गोसावी,बाळासाहेब देवकर,दादासाहेब चव्हाण, गोरक चव्हाण, जयराम चव्हाण, अरविंद जाधव भिकाभाऊ चव्हाण, भानुदास वक्ते पोपट सोळके, राजेंद्र वक्ते, बलवीर गरूड, सुनिल वक्ते, विजय सोळके, बाळासाहेब सोळके, वसंत दादंडे,संजय वक्ते,
संतोष वक्ते, महेश चव्हाण, राहुल वक्ते,
यांचा सह जेऊर कुंभारी गावातील २५०ते ३०० युवकां सह जेऊर कुंभारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे