ब्रेकिंग

उपसभापतीचीही खुर्ची घ्या, पण निर्णय शेतकरी हिताचे घ्या-उपसभापती गोवर्धन परजणे

उपसभापतीचीही खुर्ची घ्यापण निर्णय शेतकरी हिताचे घ्या-उपसभापती गोवर्धन परजणे

कोपरगाव वार्ताहर :- शेतक-यांचे हित जपण्यासाठी आम्ही सर्वानुमते तुम्हाला सभापतीपदाची खुर्ची दिली. परंतु शब्द देवून तो कधीच न पाळणे ही नेहमीची विश्वासघातकी प्रवृत्ती तुमच्या नेत्याच्या रक्तात आहे. त्यामुळे तुम्ही सभापतीपद सोडले नाही. परंतु आम्ही त्याचा विचार न करता मोर्विस व रांजणगाव देशमुख उपबाजार समिती सुरु करण्यासाठी सातत्याने मागणी करीत होतो. तुम्ही  डोळेझाक करीत असल्याने आम्ही सामुहिक राजीनामे दिले. आता तुम्ही उपसभापतीपदाची खुर्ची देखील घ्या मात्र शेतक-यांच्या हिताकडे दुर्लक्ष करू नका. असा सल्ला कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी सभापती साहेबराव रोहोम यांना दिला.

       ते म्हणाले कि,  पश्चिम भागातील व पोहेगाव परिसरातील ११ गावातील शेतकरी तुमचा निषेध करीत असल्याने   तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे तुम्ही नेत्याच्या सांगण्यावरून प्रेस नोट देत आहात.  मी वर्षापूर्वी सोडलेल्या उपसभापतीच्या खुर्चीवरही तुम्ही बसा. मात्र निर्णय शेतकरी हिताचे घ्या.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या मोर्विस व रांजणगाव देशमुख उपबाजार समित्यांचे भूमिपूजन होवूनही सव्वा वर्षात या उपबाजार समित्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत.  पोहेगावची बाजार समिती फक्त कागदावरच मंजूर आहे. त्यामुळे उपसभापतीच्या खुर्चीला कोल्हे गटाच्या विद्यमान सदस्याच्या नावाची पाटी लावून कोल्हे गटाला जबाबदारीची जाणीव करून दिली.

आम्हाला आणि आमच्या नेत्याला खुर्चीची हाव नाही. शेतकरी हित जपले जावे या उद्देशातून आम्ही कारभार करीत आलो. आमच्या मोठेपणामुळे तुम्हाला सभापतीची खुर्ची मिळाली. तुम्ही त्याचा गैरवापर केला. सभापती साहेबराव रोहोम हे कोल्हेंच्या नेतृवाखाली प्रभावीपणे भ्रष्टाचाराचे करीत असलेले रेकॉर्ड आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही स्वतःहून सामुहिक राजीनामे दिले.आम्हाला जर खुर्चीची आशा-अपेक्षा असती तर आम्ही सामुहिक राजीनामे कशाला दिले असतेतुमच्यावर अविश्वास ठराव आणला असता.आम्हाला तुमच्यासारखी खुर्चीची हाव नाही. आमच्यासाठी शेतकऱ्यांचे हित हिच आमची मोठी खुर्ची आहे.

– कोल्हेंची भूमिका नेहमीच शेतकरी विरोधी राहिली आहे.त्यांच्या कार्यकाळातील शेतकरी आंदोलन,दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवलेले तालुक्यातील शेतकरीसिंचनासाठी केवळ अडीच किलोमीटर पर्यंतच पाट पाणीपोहेगाव परिसरातील शेतकऱ्यांना जिंवंतपणी सरणावर बसण्याची वेळतीन वेळा वाहून गेलेला दुर्लक्षित मंजूर बंधाराशेतकऱ्यांच्या हक्काच्या निळवंडेच्या पाण्याबाबत दुट्टपी भूमिकाउजनी उपसा जलसिंचन योजनेबाबत नेहमीची उदासीनताकोपरगाव तालुक्याचे हक्काचे तालुक्याबाहेर घालाविलेले १३२ के.व्ही.सबस्टेशन असे एक ना अनेक शेतकरी विरोधी पराक्रम करणाऱ्या कोल्हेंना शेतकऱ्यांनी पंचायत समिती आणि विधानसभेपासून दूर ठेवले आहे. त्यातून कोणताही बोध न घेता त्याचीच पुनरावृत्ती बाजार समितीच्या कारभारातून पुढे सुरु असल्यामुळे आगामी काळातही शेतकरी त्यांना पंचायत समिती आणि विधानसभेपासून दूर ठेवल्याशिवाय राहणार नाही.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/LKQzgSRnpEmErDjaBKTgct

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या  नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html

संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र  ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html

संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html

संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html

संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज,  सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html

संपादकीय लेख क्र.१  कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे