ब्रेकिंग

भारतीय जनता पक्षावर टीका करण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवा : शहराध्यक्ष वैभव आढाव

आ. आशुतोष काळे यांच्या बेताल नगरसेवकाची दुटप्पी भूमिका टीकेची झोड
भारतीय जनता पक्षावर टीका करण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवा : शहराध्यक्ष वैभव आढाव
भारतीय जनता पक्षावर निराधार आरोप व टीका करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कोपरगावच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे. एकीकडे राज्यातील महायुती सरकारमध्ये आमदार काळे यांनी सत्तेचा उपभोग घ्यायचा. त्यांच्या पक्षश्रेष्ठींना देखील फसवायचे आणि दुसरीकडे त्यांच्या चेले चपाट्यांनी भारतीय जनता पक्षावर पातळी सोडून टीका करायची, हा दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात आला आहे अशी परखड भूमिका भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी व्यक्त केली आहे.आमदार आशुतोष काळे यांचे नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी भारतीय जनता पक्षाबाबत केलेली वक्तव्ये अत्यंत खेदजनक व आक्षेपार्ह आहेत. भारतीय जनता पार्टीसोबत मांडिला मांडी लावण्याचे एवढे वितुष्ट वाटत असेल तर तसे आमदार काळे यांना सांगा आणि भूमिका जाहीर करा. भारतीय जनता पक्षाने दाखविलेल्या मोठेपणामुळे आणि कोल्हे कुटुंबाच्या सकारात्मक भूमिकेमुळेच आशुतोष काळे यांना आमदारकीची संधी मिळाली, हे संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. अन्यथा त्यांची राजकीय परिस्थिती काय असती, हे जनतेला चांगलेच माहीत असल्याचे आढाव यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका करण्यापूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी स्वतःला मिळालेली आमदारकी ही भाजपमुळेच शक्य झाली होती, याचे भान ठेवावे. जर भारतीय जनता पक्षाविषयी एवढीच नाराजी असेल, तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जाण्याची हिंमत दाखवावी. त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाच्या पाठीशी उभी राहते, हे स्पष्ट होईल, असे आव्हानही आढाव यांनी दिले. सय्यद यांचा बोलविता धनी त्यांचे नेते आहेत का हे ही त्यांनी स्पष्ट करावे असा इशारा आढाव यांनी दिला आहे.
नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तातडीने जाहीर माफी मागावी. अन्यथा पक्षाचे वरिष्ठ नेते याची गंभीर दखल घेतील आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. भारतीय जनता पक्षावर टीका करून राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बोलावे, असा सल्लाही आढाव यांनी दिला.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/LKQzgSRnpEmErDjaBKTgct

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या  नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html

संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र  ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html

संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html

संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html

संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज,  सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html

संपादकीय लेख क्र.१  कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे