ब्रेकिंग

सोनारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे धोंडीबा सांगळे तर उपाध्यक्षपदी माधवराव सांगळे यांची निवड

सोनारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे धोंडीबा सांगळे तर उपाध्यक्षपदी माधवराव सांगळे यांची निवड 

 कोपरगांव :-तालुक्यातील सोनारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे घोंडीबा कारभारी सांगळे तर उपाध्यक्षपदी माधवराव यशवंत सांगळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ए एस पटेल यांनी काम पाहिले. या निवडीबददल जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.  याप्रसंगी संचालक सर्वश्री दत्तु सांगळे, संपतराव आव्हाड, वसंतराव सांगळे, अर्जुन सोनवणे, मोहनराव सांगळे, लता विठठल गिते, अंजनाबाई म्हाळू आघाव, हिराबाई काशिनाथ आव्हाड, सयाजी रणशुर, मनोज सांगळे उपस्थित होते.या निवडीबददल अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष धोंडीबा सांगळे म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करून संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांच्या उन्नतीसाठी आणखी प्रयत्न करू. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांचे सहकार्य सोनारी सोसायटीस वेळोवेळी मिळत असल्याचे उपाध्यक्ष माधवराव सांगळे यांनी यावेळी सांगितले. शेवटी सचिव भाउसाहेब गिते यांनी आभार मानले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे