कुंभारी नं.२ सहकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध
कुंभारी नं.२ सहकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध
कोपरगांव : तालुक्यातील कुंभारी नं. २ सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच बिनविरोध होवुन त्यात जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे गटाचे आठ सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक श्री. नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले आहे. बिनविरोध निवडलेल्या कोल्हे गटाच्या संचालकामध्ये सर्वश्री. सोपानराव चिने, गोपिनाथ निळकंठ, शब्बीर शेख, भगवान खळे, सागर घुले, चंद्रकला चतुर, ज्ञानेश्वर चिने, बाबूराव जाधव तर काळे गटाच्या अशोकराव वाघ, पदमावती साळुंके, आण्णासाहेब बढे, अर्जुन घुले, दिलीप ठाणगे या पाच संचालकांचा समावेश आहे. सदरची निवडणुक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडण्यासाठी सचिव कैलास सहाणे तर दत्तात्रय ठाणगे यांनी सहायक म्हणून काम पाहिले



