आरोग्य व शिक्षण

नेपाळ सरकार तर्फे तेथील सरकारी डॉक्टर्स ना आयुर्वेद ट्रेनिंग देण्यासाठी डॉ रामदास आव्हाड यांना निमंत्रण

नेपाळ सरकार तर्फे तेथील सरकारी डॉक्टर्स ना आयुर्वेद ट्रेनिंग देण्यासाठी डॉ रामदास आव्हाड यांना निमंत्रण

कोपरगाव प्रतिनिधी :-    नेपाळ गव्हर्नमेंट च्या नॅशनल आयुर्वेद रिसर्च व ट्रेनिंग सेन्टर काठमांडू या आरोग्य  विभागातर्फे त्यांचे डॉक्टर्स ना पंचकर्म ट्रेनिंग देण्यासाठी कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व *राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ  रामदास आव्हाड यांना व त्यांचे सहकारी श्रीरामपूर येथील आयुर्वेद तञ् सतीश भट्टड यांना निमंत्रित केले आहे .तेथे 18 ते 20 या तीन दिवस चालणारी हि कार्यशाळा डॉ रामदास आव्हाड व डॉ सतीश भट्टड तीन दिवस दिवसभर व्याख्यान व प्रत्यक्ष कर्माद्वारे करणार आहेत .भारतीय स्वदेशी आयुर्वेदाचा प्रसार परदेशात करण्यासाठी हे आयुर्वेद डॉ काठमांडूस रवाना होत आहेत .कुठल्याही aplication शिवाय नेपाळ सरकारच्या हेअल्थ विभागाकडून गेल्या सहा महिन्यापासून डॉ आव्हाड यांना विनंती करण्यात येत होती .ग्रामीण भागात राहून परदेशात अशाप्रकारे निमंत्रित केले जाणे हि नक्कीच गौरवास्पद व अभिमानास्पद गोस्ट असल्याचे डॉ आव्हाड व डॉ भट्टड यांनी सांगितले .प्रत्यक्ष कर्म करण्यासाठी डॉ आव्हाड यांची कन्या डॉ रिद्धी आव्हाड त्यांना मदत करणार आहेत .नुकतीच राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने डॉ रामदास आव्हाड यांची सलग आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून नियुक्ती केली आहे ..भारतातील सर्व राज्यातील आयुर्वेद पदवीधर डॉ ना पंचकर्म शिकविण्याचे काम डॉ आव्हाड करत आहेत. आता परदेशातील डॉ ना आयुर्वेद शिकविण्याचे कामही ते काठमांडूस जाऊन करणार आहेत .त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे