राजकिय

आपेगांव सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी वाल्मीक भूजाडे तर उपाध्यक्षपदी संतोष पगारे यांची निवड

आपेगांव सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी वाल्मीक भूजाडे तर उपाध्यक्षपदी संतोष पगारे यांची निवड

कोपरगांव :-तालुक्यातील आपेगांव सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे वाल्मीक श्रीराम भूजाडे तर उपाध्यक्षपदी संतोष राधू पगारे यांची नुकतीच निवड झाली त्याबददल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री. गांगुर्डे यांनी काम पाहिले. श्री. वाल्मीक भूजाडे यांच्या नावाची सुचना संचालक लहानु गव्हाळे यांनी केली तर त्यास रामभाउ खिलारी यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी श्री. नागनाथ गायकवाड यांनी सुचना केली तर दादासाहेब गव्हाळे यांनी अनुमोदन दिले.
प्रारंभी पुर्व भागाचे कैवारी व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्यांना उजाळा देवुन त्यांचा पुर्णाकृती पुतळा पंचायत समिती कोपरगावच्या आवारात उभारण्यांत यावा म्हणून ठराव करण्यात आला. कोपरगांव बाजार समितीचे माजी संचालक अंबादास पाटोळे यांनी प्रास्तविकात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी संकटकाळात केलेल्या कामाची माहिती दिली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्वश्री दत्तात्रय पाटोळे, सोपानराव गव्हाळे, ज्ञानदेव गायके, सरपंच मंगलताई भूजाडे, उपसरपंच गणपतराव गव्हाळे, प्रकाश गव्हाळे, हरिभाउ गव्हाळे, आसाराम पगारे आदिंनी अभिनंदन केले. सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सचिव प्रविण गव्हाळे, बाळासाहेब शिंदे यांनी सहकार्य केले. शेवटी उपसरपंच गणपतराव गव्हाळे यांनी आभार मानले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे