संपादकीय

स्वातंत्रसेनानी माधवराव आढाव यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून उद्यानाचे सुशोभीकरण करावे

स्वातंत्रसेनानी माधवराव आढाव यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून उद्यानाचे सुशोभीकरण करावे

कोपरगांव :-कोपरगांव शहरासाठी नव्याने सि स नं २०४१ मध्ये पालिका प्रशासकीय इमारतीचे काम जवळ जवळ पुर्णत्वाकडे आले असुन ते वापरासाठी खुले होण्यापुर्वी शेजारील सिस नं २०४० मधील माधव उद्यानचे नावात बदल न करता त्या ठिकाणी स्वातंत्रसेनानी माधवराव आढाव यांचा पुर्णाकृती पुतळा उभारून संपुर्ण उद्यानाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी लक्ष्मी माधव प्रतिष्ठानचे विजय आढाव यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे केली आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगांव नगरपालिकेची स्थापना १९४७ मध्ये झाली. स्वातंत्रसेनानी स्व. माधवराव आढाव यांनी संपुर्ण आयुष्य खर्ची घालून कोपरगांव शहर विकासात मोलाची भूमिका बजावून असंख्य जनविकासाची कामे केलेली आहेत. या कार्याची आठवण म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १९६५ मध्ये माधव उद्यानाची निर्मीती करण्यांत आली. आज या घटनेस ५६ वर्षे पुर्ण झालेली आहेत. या माधव उद्यानाचे सुशोभीकरण करून तेथे त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा म्हणून पालिकास्तरावर वेळोवेळी ठराव झालेले आहेत, तेंव्हा सिसनं २०४० मधील माधव बागेचे आरक्षण असलेल्या जागेवर स्वातंत्रसेनानी माधवराव आढाव यांचा पुर्णाकृती पुतळा तात्काळ उभारण्यांत यावा व या बागेचे अन्य नामकरण न करता माधव उद्यान म्हणूनच या बागेचे सुशोभीकरण करण्यांत यावे असे शेवटी म्हटले आहे. रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, विविध विकास कामांत तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांची मोलाची भूमिका असुन त्यांच्या कार्यकाळातील कामे आजही शहराच्या वैभवात भर घालत आहे मात्र हा इतिहास कुणी पूसुन टाकण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही तसेच स्व. माधवराव आढाव यांचे कोपरगांव शहर विकासात मोठे योगदान आहे त्यांचा इतिहास पुसला जाणार नाही, कुणीही माधव उद्यानाचे नांव बदलु नये. याप्रसंगी गटनेते रवींद्र पाठक, भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, सर्वश्री. अतुल काले, राजेंद्र सोनवणे, बबलु वाणी, जितेंद्र रणशुर, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, अविनाश पाठक, अशोकराव लकारे, बापू पवार, संदिप देवकर, दिनेश कांबळे, विवेक सोनवणे, वैभव गिरमे, प्रशांत कडु, दिपक जपे, जनार्दन कदम, सत्येन मुंदडा, गोपी गायकवाड, अल्ताफ कुरेशी, राजेद्र लोखंडे, सतिष रानोडे, पिंकी चोपडा, किरण सुपेकर, खालीकभाई कुरेशी, शंकर बि-हाडे, अर्जुन मरसाळे, सोमनाथ ताकवले, जगदिश मोरे, गौरव आढाव, आण्णा खरोटे, प्रभुदास पाखरे आदि उपस्थित होते. मुख्याधिकारी शांताराम गोसावी याप्रसंगी म्हणाले की, यापुर्वीच्या पालिका कामकाजात सदर माधव उद्यानासंदर्भात जे ठराव झाले आहेत त्यात कुठल्याही प्रकारे बदल होणार नाही, याच्या सुशोभीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे