संपादकीय

कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप

संपादकीय 

कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप

सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असे मनोरंजन म्हणजे कोपरगावची जत्रा

कोपरगाव तालुका संत महंताची भूमी म्हणून ओळखला जात असतो या तालुक्यामध्ये अनेक संत महंत ऋषीमुनी होऊन गेले आहे कोपरगाव चा उल्लेख अनेक धर्मग्रंथात देखील केला जात असतो या सर्व धार्मिक बाबतीत महत्त्वाचा एक सण म्हणजे महाशिवरात्र होय देशभरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी होत असते त्याचप्रमाणे कोपरगावात देखील महाशिवरात्र साजरी होत आहे कोपरगाव तालुक्यातील शुक्राचार्य महाराज बेट, राघवेश्वर मंदिर कुंभारी, शृग ऋषी मंदिर संवत्सर, रामेश्वर मंदिर वारी, काशी विश्वनाथ मंदिर जनार्दन स्वामी मंदिर बेट कोपरगाव अशा कोपरगाव तालुक्यातील विविध ठिकाणी महादेवाचे मंदिर असून महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते कोपरगाव शहरामध्ये देखील महाशिवरात्र दरवर्षी साजरी केली जाते. यानिमित्ताने कोपरगाव शहरामध्ये जत्रा  शहरातील बाजारतळ येथे ८ मार्च पासुन आयोजित केली आहे.  ही जत्रा म्हणजे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक पर्वणीच असते अनेक वर्षांपासून कोपरगाव शहरात ही जत्रा भरत असते .या जत्रेच्या निमित्ताने मोठ मोठे पाळणे त्याचबरोबर खेळणी कॉस्मेटिक अशा विविध प्रकारचे दुकाने उभारले जात असतात. त्याचबरोबर खाद्यपदार्थाचे देखील स्टॉल लावण्यात येत असते. या जत्रेत रात्री शहरातील नागरिक आनंद लुटत असतात  शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील नागरिक देखील या जत्रेत सहभागी होऊन मनोरंजन करत असतात अनेक वर्षांपासून चालू असलेली जत्रा आज तयागत चालूच आहे या जत्रेसाठी अनेक वेळा अडथळे देखील आले ,काही वेळा या जत्रेमध्ये तरुणांच्या वेगवेगळ्या गटात हाणामाऱ्या देखील झाल्या वाद विवाद झाले, त्याचबरोबर अनेक वेळा जत्रा कुठल्या जागेवर भरावयची या ठिकाणी सुद्धा मतभेद झाले.अनेक वेळा जागा बदलल्या गेल्या, कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी या जत्रा भरविण्यात आलेल्या होत्या अनेक ठिकाणी तक्रारी आल्यानंतर या जत्रेचे ठिकाण देखील बदलण्यात आले.तसेच जत्रेच्या निवेदासाठी अनेक वेळा रस्सीखेच देखील झाली.परंतु या जत्रेला मात्र नागरिकांचा प्रतिसाद मात्र काही कमी झाला नाही. शहरात कुठेही जत्रा भरविली तरी शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक या जत्रेला भरभरून प्रतिसाद देत असतात .आठ ते पंधरा दिवस चालणारी ही जत्रा कोपरगावच्या नागरिकांसाठी एक पर्वणी समजली जात असते पूर्वी देखील या जत्रेला तेवढीच गर्दी असायची आज देखील या जत्रेला तेवढाच प्रतिसाद मिळत असतो .काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील नागरिक शहरातील नागरिकांच्या घरी महाशिवरात्री निमित्ताने येत असायचे आणि या महाशिवरात्री निमित्ताने या जत्रेत आनंद लुटायचे. देवदर्शन करून महाशिवरात्रीला  या जत्रेमध्ये सहभागी होऊन मनोरंजन होत असायचे. कोपरगाव सारख्या शहरामध्ये सामान्य माणसाला आजच्या महागाईच्या दुनियेमध्ये खिशाला परडेल असं मनोरंजन म्हणजे एकमेव जत्रा ,म्हणजे ती कोपरगाव ची जत्रा होय, कारण संपूर्ण कुटुंबासह बाहेर पडायचं म्हणल्यावर मोठा खर्च असतो   त्यामुळे नागरिकांच्या खिशाला परवडेल असं मनोरंजन या जत्रेतून होत असतं ,म्हणून उत्तर या महागाईच्या जमान्यात अनेक वर्षांपासून कोपरगाव ची जत्रा आजही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे अशी कोपरगाव ची जत्रा आजही मोठ्या दिमाखात चालू आहे

लेखन :- रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युज संपादक



 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे