संपादकीय

श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे

संपादकीय

श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे

देशात अनेक श्रीमंत लोक राहतात या श्रीमंत लोकांनी गोरगरिबांना नेहमी मदत करत असतात. या श्रीमंतांमुळे गोरगरिबांना रोजगार मिळत असतो आपल्या भारतीय संस्कृतीत आध्यात्मिक क्षेत्रात देखील अनेक धनिक लोक दानधर्म पुण्य करत असतात परंतु काही श्रीमंत मात्र याला अपवाद ठरत आहे काही श्रीमंतांना श्रीमंतीचा माज चढलेला आहे हा माझा वेळीच उतरण देखील गरजेचे आहे. यामुळे अनेकांना प्राण गमवावा लागत आहे .अनेक श्रीमंत आपल्या मुलांना दारू ,पब.पार्टि अशा विविध व्यसनांना परवानगी देताना आढळून येत आहे.या व्यसनातुन अनेक अपघात, खून,हाणामार्या घडत असतात. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे
पुण्यात मद्यधुंद अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे पोर्शेकार चालवून दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील व पुण्यातील बडे उद्योजक विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यावर हा बिल्डर फरार झाला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.पुण्यात शनिवारी विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने दारू पिऊन बेदरकारपणे आलीशान गाडी चालवत समोरील दुचाकीवरील दोघांना उडवले होते. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणी नागरिकांनी त्याला पकडून चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले होते. मात्र, बड्या बिल्डरचा हा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी मोठी यंत्रणा लागल्याचा आरोप करण्यात आला. त्याला काही वेळातच जामीन देखील मंजूर करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी मोठ्या प्रमाणात बिल्डर विरोधात आणि पोलिसांच्या संशयी भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्याने पुणे पोलिसांनी बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.आपला मुलगा हा अल्पवयीन असूनही त्याला पोर्शे कार चालवायला दिली आणि मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३ , ५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल देखील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अग्रवाल ने आपल्या  मुलास दारू पिण्यास पार्टी करण्यास परवानगी दिली आहे असे त्याच्या जबाबातून दिसत आहे. अशा पब मध्ये तसेच डान्सबार मध्ये अनेक श्रीमंतांची मुले दारू पिऊन बेवडी होत आहे. या बेवड्यांमुळे अनेकांच्या जीवित धोका निर्माण झाला आहे तसेच पब मध्ये डान्सबार मध्ये गांजा पेवुन गंजडी होत आहे गांजा त्याच बरोबर गर्दा पिऊन गर्दुल्ले होत आहे श्रीमंतांची ही गर्दुल्ले गंजडी आणि बेवडे यांच्यामुळे गोरगरिबांना जीव गमवावा लागत आहे अशा गंजडी गर्दुल्ले बेवड्यांना वेळीच आवर घालणे देखील गरजेचे आहे .अशा घटना देशात वारंवार घडत आहे घडत असतील त्यामुळे या श्रीमंतांच्या गंजडी गर्दुल्ले आणि बेवड्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे हे श्रीमंत लोक जरी पैशाच्या जोरावर गरिबांना झुकवत असाल. परंतु प्रत्येकाला देखील निसर्गाच्या शक्ती पुढे झुकवावेच लागते जसं पेराल तसं उगवेल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे एक ना एक दिवस तुम्हालाही या पापाची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही

लेखन रवींद्र जगताप संपादक
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे