राजकिय

जवळकेचे राष्ट्रवादीचे माजी सरपंच बंडोपंत थोरात यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार

जवळकेचे राष्ट्रवादीचे माजी सरपंच बंडोपंत थोरात यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार 

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगांव -तालुक्यातील जवळके येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी सरपंच बंडोपंत थोरात व त्यांच्या असंख्य सहका-यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्याबददल त्यांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते गुरूवारी सत्कार करण्यांत आला.याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक अरूणराव येवले, अशोकराव औताडे, बाजार समितीचे माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, कोपरगांव तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष रामदास राहणे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष कैलास राहणे, निवृत्ती गोर्डे, आदि उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातुन भाजपात प्रवेश केलेल्या सर्वश्री. बाबासाहेब थोरात, सुनिल थोरात, जालींदर थोरात, भागिनाथ घुमरे, भाउ पाटील थोरात, कानिफनाथ थोरात, लक्ष्मण थोरात, संतोष थोरात, विजय शिंदे, गणेश थोरात, रामनाथ थोरात, वाल्मीक थोरात, अरूण थोरात, रामनाथ बबन थोरात यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यांत आला. श्री. बंडोपंत थोरात म्हणाले की, जवळके परिसरात आजवर आपण प्रपंचातुन समाजकारणाचे काम केले, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्यशैलीतुन आम्ही घडलो. गांवच्या विकासात वंचितांचे प्रश्न कसे सोडवायचे याची शिकवण मिळाली, आता पुन्हा भाजपाच्या माध्यमातुन समाजकारणाला गती येईल. युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांची अभ्यासू प्रतिमा मतदारसंघाच्या उत्कर्षासाठी योग्य आहे त्यांचे हात आणखी बळकट करू. शेवटी भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी आभार मानले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे