अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा स्नेहलता कोल्हेंकडुन अभिनंदन
संपादक रविंद्र जगताप
अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा स्नेहलता कोल्हेंकडुन अभिनंदन
कोपरगांव :-अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीत सेनेचा उमेदवार निवडुन जाणार की भाजपाचा ही उत्कंठा संपुर्ण महाराष्ट्र राज्याला लागली होती मात्र विरोधी पक्षनेते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही बिरूदावली सार्थ ठरवत धनंजय महाडीक यांना राज्यसभेवर निवडुन आणण्यांत मोलाचा वाटा उचलला त्याबददल रेल्वेमंत्री पियूष गोयल, खासदार डॉ अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक या तिन्ही उमेदवारांचे अभिनंदन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले असुन भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष व इतर सर्व सेलचे पदाधिकारी यांनीही हा विजयोत्सव साजरा केला. सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ वर्षात उत्तुंग भरारीची कामगिरी करत भारताचे नांवे जगात उंचावण्यांसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. राज्यसभा निवडणुक सर्वांनीच प्रतिष्ठेची केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी विशेष रणनिती आखून ती विजयात परावर्तीत केली त्याबददल ख-या अर्थाने त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. नामदार पियूष गोयल यांच्याकडे आता रेल्वे खात्याच्या कारभाराव्यतिरिक्त राज्यसभेचे नेते म्हणून जबाबदारी आली आहे. खासदार धनंजय महाडीक यांना राज्यातील आमदारांबरोबरच कोल्हापूरच्या देवीचा आर्शिवाद मिळाला आहे त्यांच्या राजकीय वाटचालींस सर्वांच्यावतीने अभिनंदन



