महाराष्ट्र

आनंदाचा शिधा उपक्रमात वैजापूर तहसील जिल्ह्यात प्रथम

आनंदाचा शिधा उपक्रमात वैजापूर तहसील जिल्ह्यात प्रथम

वैजापूर प्रतिनिधी विजय त्रिभुवन :- महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त गोरगरिबांसाठी शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा उपक्रमात सर्व उत्कृष्ट कार्य करून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात प्रथम श्रेय प्राप्त झाल्यावर तहसील कार्यालय वैजापूर सभागृह येथे रेशन दुकानदार संघटनी व स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने आयोजित केल्याने तहसील पुरवठा विभाग अधिकाऱ्यांचा सत्कार आमदार प्रा. रमेश बोरनारे सर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले वैजापूर तालुक्यातील एकूण 57 हजार शिधापत्रिका धारकांना दिवाळीच्या सणानिमित्त राज्य सरकारच्या वतीने शंभर रुपये मध्ये साखर, रवा, पामतेल, हरभरा दाळ, प्रत्येकी एक किलो राज्यात गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने उपक्रम अवघ्या १०० रुपये मध्ये शिधा कौतुकास्पद निर्णय राज्य सरकारने घेतला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार प्रा. रमेश बोरनारे सर सर्व अधिकाऱ्यांचे राशन दुकानदारांचे आभार मानले यावेळी मा प्रा, आमदार रमेश बोरनारे माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप , गट विकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे, पुरवठा निरीक्षक बहुरे, कर्मचारी दिलीप राजपूत, नगरसेवक पारस घाटे, स्वप्निल जेजुरकर, शैलेश चव्हाण, ज्ञानेश्वर टेके, नायब तहसीलदार मनोहर वाणी, भाऊसाहेब इिजुर्डे, संघटनेचे अध्यक्ष भगवान व्यवहारे, राजेंद्र पवार, प्रकाश वाघ, कमलेश आंबेकर, पवन चव्हाण सर्व सदस्य आणि स्वस्त धान्य दुकानदार यांची उपस्थिती होती

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे