आरोग्य व शिक्षण

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत गुरु पौर्णिमा उत्साहाने साजरी..!

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत गुरु पौर्णिमा उत्साहाने साजरी..!

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगांव-श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं गुरु-शिष्य परंपरेची महती स्पष्ट करणारी गुरु पौर्णिमा उत्साहाने साजरी झाली.या प्रसंगी महर्षि व्यास यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.
गुरु पौर्णिमेचे महत्व स्पष्ट करतांना मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी भारतिय संस्कृती मध्ये गुरु-शिष्य परंपरेची थोर परंपरा असुन विदयार्थीनी त्यांची माहीती करुन घेणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले.प्रारंभी कु.जोया पठाण,निदा फातेमा मन्सुरी,मुब्बाशिरा मन्सुरी,गौरी राऊत,क्रांती लासनकर,मनस्वी निकुंभ,स्वरा टोरपे,वैष्णवी वाडेकर,प्रणिता अहिरे आदी प्रार्थना म्हटली.माहीन शाह हीने गुरु पौर्णिमेचे महत्व स्पष्ट केले.आफशा शहा हीने दिनविशेष सांगितले.गुरु पौर्णिमाची महती सांगणारे नृत्य कु.सायली घोडेराव,दिपाली आदमाने,साची मुदबखे,अन्यना मापारी,समिक्षा सुकटे,जिनत शेख यांनी सादर केले.तनुष्का सोनपसारे,अरिबा शहा हीने प्रश्नमंजुषा सादर केली.गुरु द्रोणाचार्य विषयी सुजल साबळे यांनी माहीती सांगितली.गायत्री आवारे हीने समूहगीत सादर केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन गायत्री चंडाले व जारा शेख हीने केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदयालयांचे शिक्षक श्री.के.एस.गोसावी,श्री.वाय.के.गवळे,श्री.पी.बी.जगताप,श्री.एस.सी.बर्डे,सौ.एस.टी.डरांगे,सौ.एस.ए.अजमेरे,सौ.पी.डी.तुपसैंदर,सौ.सी.व्ही.निंबाळकर,सौ.जी.एन.जाधव,सौ.साळुंकेआर.बी.,सौ.एस.आर.गंगवाल,सौ.एस,डी.जाधव,सौ.एस.आर.अजमेरे आदि शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले.गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन श्री.चंद्रकांत ठोळे,श्री.संदीप अजमेरे,आदिंनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर,उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. गायकवाड,पर्यवेक्षिका यु.एस.रायते आदि बहुसंख्य शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे