हर घर तिरंगा व स्तनपान सप्ताहानिमित्त संवत्सर परिसरात विविध कार्यक्रम संपन्न
हर घर तिरंगा व स्तनपान सप्ताहानिमित्त संवत्सर परिसरात विविध कार्यक्रम संपन्न
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :-. हर घर तिरंगा व स्तनपान सप्ताह या उपक्रमांतर्गत संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील अंगणवाडीच्या आवारात महिलांचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्याबाबत तसेच लहान बालकांच्या आहाराबाबत व स्वच्छतेबाबत या कार्यक्रमात महिलांनी आपली मते मांडलीत.संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुलोचना ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेचे माजी केंद्रप्रमुख दिलीपराव डेपले, पत्रकार शिवाजीराव गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी पर्यवेक्षिका श्रीमती उमा खोले यांनी प्रास्ताविक केले. गरोदर महिला व ३ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांच्या आहाराविषयी तसेच आपल्या घरातील परसबागेत शेवगा, कढीपत्ता, अळू, शेपू, गवार, पालक, मेथी अशा अनेक पालेभाज्यांचे उत्पादन घेऊन या सेंद्रीय भाज्यांचा अधिकाधीक आहारामध्ये वापर करावा असे मार्गदर्शन श्रीमती खोले यांनी केले. आहारामध्ये गूळ, शेंगादाणे, खारीक, राजगिरा यांचाही वापर केला तर त्याचा चांगला परिणाम होतो असेही मार्गदर्शन त्यांनी केले.माजी केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले यांनीही आपल्या मनोगतामधून स्वच्छतेचे महत्व विषद केले. शाळा. अंगणवाड्यांबरोबरच आपापल्या घराच्या सभोवताली स्वच्छता ठेवण्याबाबतची काळजी प्रत्येकाने घेतली तर आरोग्य चांगले राहण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. महिलांनीही स्तनपान सप्ताहाचे महत्व लक्षात घेऊन आपल्या बाळांची योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येक बालक हा उद्याचा उज्ज्वल भारताचा जबाबदार नागरीक बनू शकतो हा दृष्टीकोन समोर ठेऊन महिलांनी बालकांचे पालन पोषण करावे असे सांगून श्री ढेपले यांनी पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्यासाठी पाठवावीत. बाहेर पैसे खर्च करुन शिक्षण घेण्यापेक्षा मराठी माध्यमांच्या शाळांमधून मुलांना शिकण्यासाठी पालकांनी प्रेरीत करावे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रत्येक नागरीकाने आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकाऊन देशाप्रती प्रेम व निष्ठा दर्शवावी असेही आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमास परिसरातील महिला, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. श्रीमती तिरमखे यांनी आभार व्यक्त केले.
दहा लाख वाचक असलेल्या सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी या लिंकचा वापर करा
https://chat.whatsapp.com/JDIiuSdL0em4sJ8ITiKSeB





