देश-विदेश

अमृत – महोत्सवी तिरंगा मोटारसायकल रॅलीस स्नेहलताताई कोल्हे यांनी दाखविला झेंडा 

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून कार्यस्थळापासून कोपरगांवच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत आयोजित केलेल्या तिरंगा मोटारसायकल रैलीस भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, बिपिनदादा कोल्हे यांनी झेंडा दाखविला.
अमृत – महोत्सवी तिरंगा मोटारसायकल रॅलीस स्नेहलताताई कोल्हे यांनी दाखविला झेंडा 
कोपरगांव :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून कार्यस्थळापासून कोपरगांवच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत आयोजित केलेल्या तिरंगा मोटारसायकल रैलीस भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी झेंडा दाखविला. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते. शनिवारी सायंकाळी ५ वाजता सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानानिमीत मोटारसायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सौ. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पुर्ण झाली. देशनिष्ठेची ज्योत प्रत्येकाने तेवत ठेऊन हर घर तिरंगा, अभियान यशस्वी करून स्वातंत्र्यचळवळीत ज्ञात अज्ञात घटकांनी दिलेल्या योगदानाची आठवण ‘ठेवावी.
८० हजार झेंडयांचे वाटप
        कोपरगांव शहरासह मतदारसंघात हर घर तिरंगा अभियानासाठी प्रशासकीय यंत्रणेसह, भाजपा पदाधिकारी यांचे मार्फत ८० हजार तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले असल्याचे कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले. शनिवारी संपूर्ण दिवसभर कोपरगाव मतदार संघात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा जय घोष सुरू होता.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात आपल्या देशाचे सर्वाधिक झेंडे ७५व्या अमृत महोत्सवी १३ ते १५ ऑगस्ट रोजी झळकले पहिजे ही विश्वसंकल्पना तुम्हा-आम्हांला दिली, ती सर्वांनी सार्थ करून दाखविण्यांसाठी पुढाकार घ्यायचा आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक त्र्यंबकरराव सरोदे, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर परजणे, बापुसाहेब बारहाते,राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, कामगारनेते मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, चीफ केमीस्ट विवेककुमार शुक्ला, चीफ इंजिनियर के ‘के शाक्य, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, संचालक, कामगार, शिंगणापुरच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, कोल्हे कारखाना संरक्षण खात्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे