आरोग्य व शिक्षण

देवगड येथे भारतीय योग संस्थानच्या वतीने शंख प्रक्षालन शिबीर संपन्न

देवगड येथे भारतीय योग संस्थानच्या वतीने शंख प्रक्षालन शिबीर संपन्न

महाराष्ट्र राज्याचे उपप्रधान योगगुरु प्रा.डॉ.उत्तम काळवनेसर यांनी साधकांना दिले योगाचे धडे

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव (प्रतिनिधी) भारतीय योग संस्थानच्या वतीने शंख प्रक्षालन शिबीर नुकतेच देवगड येथे संपन्न झाले तीनशेहून अधिक योग साधकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला भारतीय योग संस्थानचे महाराष्ट्र राज्याचे उपप्रधान प्रा डॉ.उत्तम काळवणेसर यांचे मार्गदर्शनाखाली शिबीराचे नेवासा तालुक्यातील देवगड येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पहिल्या दिवशीच्या सत्रात योग साधकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला महिला साधकांनी नृत्य व गायन सादर करत उपस्थिताना मंत्र मुग्ध केले भारतीय योग संस्थानच्या माध्यमातून ऋतु बदलाच्या काळात निरोगी आरोग्यासाठी ,पाचनक्रिया सुधारण्यासाठी शंख प्रक्षालन शिबीराचे आयोजन केले जाते या विषयी बोलताना वारी येथील योग शिक्षक वाल्मिक कर्डीलेसर यांनी सांगितले की योग क्रियेने शंखात पाणी टाकल्यानंतर ज्याप्रमाणे पाणी चक्राकार फिरून ते बाहेर पडते, त्याप्रमाणे तोंडाने पाणी प्यायल्यानंतर ते पाणी थोड्या वेळानंतर पोटातील मळासकट आतड्यांना स्वच्छ करीत गुदाद्वारे बाहेर फेकले जाते. म्हणून या क्रियेला ‘शंखप्रक्षालन’ असे म्हणतात. कोरोना मुळे 2019 नंतर प्रथमच शिबिर होत असल्याने राज्यभरातून संभाजीनगर, जालना, सोलापुर,सातारा या जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील वारीच्या साधकांनी मोठया संख्येने शंख प्रक्षालन शिबिराचा लाभ घेतला यावेळी पहाटे चार वाजता शंख प्रक्षालन क्रियेला सुरुवात झाली शास्त्रोक्त माहिती देवून त्याचे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी होणारे फायदे याबाबत माहिती देऊन प्रथम त्रियक ताडासन,कटी चक्रासन ,कमर चक्रासन,त्रियक भुजंगासन, उदारकर्षनासन आदी पाच आसने करुन संपुर्ण पोट पचनसंस्था स्वच्छ करून पोटाचे विकार दुर केले जातात त्यानंतर वमन, रबरनेती,जलनेती, आय वॉश, योग निद्रा याबद्दल शास्त्रोक्त माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवून सर्व क्रिया साधकांकडुन व्यक्तिशः लक्ष देऊन करून घेतल्याने साधकांनी समाधान व्यक्त केले शिबीर सांगता कार्यक्रमात सप्टेंबरमध्ये वाढदिवस असणाऱ्या सर्व साधकांचा भारतीय योग संस्थानच्या पध्दतीने संस्कृत मध्ये मंत्रोच्चार करत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अनेक साधकांनी अनुभव सांगत आयोजकांचे आभार मानले यावेळी प्रमुख अध्यक्षीय भाषणात योग गुरु प्रा डॉ. उत्तम काळवणे सर यांनी साधकांना योगा चे धडे दिले बद्धकोष्ठता, जीर्ण मलावरोध, आम्लता, गॅस, अपचन, मूळव्याध आणि पचनाच्या अन्य व्याधींसाठी हा रामबाण उपाय आहे.शरीरातील कडकी, अशक्तपणा असे उष्णतेमुळे निर्माण होणारे विकार दूर होतात. मलसंचयामुळे रक्त अशुद्ध होते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरुमे या क्रियेने कमी होतात. त्वचा कांतिमान होते. शरीरातील अनावश्यक मेद (जाडी) कमी होऊन शरीर हलके व ताजेतवाने होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी केले जाते. परिणामी, मधुमेह नियंत्रित होतो. संधिवात, स्लिप डिस्क, मानेचे विकार, शरीरावरील सूज कमी होते.तसेच शंखप्रक्षालन नंतर घ्यावयाची खबरदारी बाबत माहिती दिली व सर्वांचे आभार मानले भारतीय योग संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उप प्रधान प्रा.उत्तम काळवणेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश शेळके,आनंद अग्रवाल,भाऊ सुराडकर,संजय औरंगाबादकर, कैलास जाधव, विद्या ताकसंडे, शिवाजी गायकवाड, सुनिता डोमाळे,सुरडकर आदींसह अनेक ज्ञात,अज्ञात साधकांनी परिश्रम घेतल्याने शिबीर यशस्वीपणे पार पडले वारी येथुन योग शिक्षक वाल्मिक कर्डीले सर,केंद्रप्रमुख अशोकराव कानडे, उपकेंद्र प्रमुख गणेश कोरके, योग साधक अशोक मोरे,गिरीश खवले, संतोष कवाडे,दत्ता दुशिंग आदी साधकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे