आरोग्य व शिक्षण

पोहेगावच्या श्री. ग. र. औताडे विद्यालयाला ६० लाख रुपये देणार – आ. आशुतोष काळे

.ग. र. औताडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर

पोहेगावच्या श्री. ग. र. औताडे विद्यालयाला ६० लाख रुपये देणार – आ. आशुतोष काळे

पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.ग. र. औताडे विद्यालयात प्रयोगशाळा वाढल्यामुळे वर्ग खोल्या कमी पडत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना येत असलेल्या अडचणी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे. सर्वच विद्यार्थी एकाच वेळी शिक्षण घेवू शकतील त्यासाठी नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ६० लाख रुपये देणार असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यानी सांगितले.पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. ग. र. औताडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वाड्या वस्त्यावर, बहुजनांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने कर्मवीर शंकररावजी काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी तन मन धनाने प्रयत्न करून रयत शिक्षण संस्थेचे राज्यासह जिल्ह्यात जाळे विणून कष्टकरी, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील पुढे चालविला. हाच वारसा पुढे चालवितांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची मला जबाबदारी दिली, दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून मी देखील कर्मवीरांचे आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून तनमनधनाने रयत शिक्षण संस्थेच्या भरभराटीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. पोहेगाव व परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी श्री.ग. र. औताडे विद्यालयाचे काम समाधानकारक असून विद्यालयाला सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रम प्रसंगी शालेय विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे आ. आशुतोष काळे यांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी व्याख्यात्या प्रा. उज्वलाताई भोर यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, कर्मवीर भाऊराव पाटील व कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षण प्रसाराचे काम आ. आशुतोष काळे अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहेत. त्यांच्या रूपाने जबाबदार, उच्च विद्याविभूषित नेतृत्व रयत शिक्षण संस्थेला लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे, वसंतराव आभाळे, राहुल रोहमारे, अशोक रोहमारे, एम.टी. रोहमारे, सुनील शिंदे, बाबुराव थोरात, काकासाहेब जावळे, नंदकिशोर औताडे, के.डी. खालकर, मधुकर औताडे, दिलीपराव औताडे, उत्तमराव औताडे, निवृत्ती शिंदे, वाल्मिक नवले, अनिल वर्पे, राजेंद्र पाचोरे, भाऊसाहेब सोनवणे, जयंतराव रोहमारे, योगेश औताडे, बाळासाहेब औताडे, काकासाहेब गवळी, सुरेश भालेराव, गंगाधर औताडे, विद्यालयाचे प्राचार्य एस.के. शिंदे, कुरकुटे सर, छत्रपती संभाजी विद्यालय गौतमनगरचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, अण्णासाहेब चौधरी, वसंतराव पाचोरे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे