सौ.विद्युलता शामराव मोकळ यांची अंगणवाडी राज्य समन्वयक पदी नियुक्ती

सौ.विद्युलता शामराव मोकळ यांची अंगणवाडी राज्य समन्वयक पदी नियुक्ती
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :- शिक्षण क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य राज्यात कामकाज करत असुन नुकताच पुण्यात या संघटनेचा कार्यक्रम पार पडला असुन रविवार दि. 08/10/2022 रोजी. विजय तेंडुलकर नाट्यगृह स्वारगेट, पुणे येथे खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेवर सौ.विद्युलता शामराव मोकळ यांची अंगणवाडी राज्य समन्वयक या पदावर स.न.२०२२ ते २०२५ या कालावधी करिता निवड झालेली आहे.सदर निवड म.राज्य अध्यक्ष श्री.भारत रासणे साहेब कोल्हापूर यांच्या समक्ष मा.ना.सतेज पाटील (बंटी पाटील)मा.गृहराज्य मंत्री ,ग्रामीण महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते नियुक्ती पत्र देवुन सत्कार करण्यात आला आहे.विद्युलता मोकळ ह्या सामाजिक कार्यात अग्रेसर असुन शिक्षण क्षेत्रात येणार्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरणार आहे.त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातिल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे



