महापरिनिर्वाण दिनि मेगा ब्लाँक मुळे रेल्वे गाड्या रद्द, ५,व ६.डिंसेबरचा मेगा ब्लाँक रद्द करावा :- गौतमराव बनसोडे
महापरिनिर्वाण दिनि मेगा ब्लाँक मुळे रेल्वे गाड्या रद्द, ५,व ६.डिंसेबरचा मेगा ब्लाँक रद्द करावा :- गौतमराव बनसोडे
कोपरगाव , :- ६ डिसेंबर रोजी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो.देशभरातुन भिम सैनिक लाखोंच्या संख्येने मुंबईत अभिवादन करण्यासाठी भिम सैनिक येत असतात.विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाला विदर्भ महाराष्ट्रसह २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनसाठी जळगाव स्थानकात यार्ड, रिमॉडेलिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी जाणीवपूर्वक ५ व ६ डिसेंबर २०२२ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. म्हणून हावडा ते मुंबई मार्गावरील विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेससह अप व डाऊन अशा ३८ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय संतापजनक असून, हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांनी म्हटले आहे.६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनीच हा मेगा ब्लाँक घेवुन रेल्वे गाड्या रद्द केल्या यामुळे लाखो अनुयायींची गैरसोय होणार आहे.रेल्वे गाड्या रद्द करण्याच्या निर्णयांचा निषेध घटनाकार मैत्री संघाने केला आहे.





