भारतातील तमाम जनतेला हक्क अधिकार देणारा ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान :- गौतमराव बनसोडे
भारतातील तमाम जनतेला हक्क अधिकार देणारा ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान :- गौतमराव बनसोडे
कोपरगाव प्रतिनिधी :-भारतात विविध जाती धर्माचे पंथाचे लोक राहतात.या सर्व जाती धर्माच्या नागरिकांना जोडणारा एकमेव ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय असे प्रतिपादन घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांनी २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिना निमित्ताने व्यक्त केले आहे.आज घटनाकार मैत्री संघाच्या वतिने २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन साजरा देशभरात मोठया उत्साहात साजरा केला जात आहे.भारत देशात विविध जाती धर्म असुन सर्वाना एकत्र ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. देशाचा प्रधानमंत्री पासून गावातील शेत मजुरापर्यत सर्वाना समान न्याय,हक्क, अधिकार देणारा ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय. घटनाकार मैत्री संघाच्या वतिने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करुन समस्त भारतातील नागरिकांना या प्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.




