आरोग्य व शिक्षण

“एक सक्षम अधिकारी बनायचे असेल तर संयम आणि चिकाटी यांना सातत्यपूर्ण परिश्रमांची जोड दया स्पर्धापरीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.”

“एक सक्षम अधिकारी बनायचे असेल तर संयम आणि चिकाटी यांना सातत्यपूर्ण परिश्रमांची जोड दया स्पर्धापरीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.”
“एक सक्षम अधिकारी बनायचे असेल तर संयम  आणि चिकाटी यांना सातत्यपूर्ण परिश्रमांची जोड दया स्पर्धापरीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.” असे प्रतिपादन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.पंकज नाईकवाडे यांनी केले. के. जे. सोमैया महाविद्यालयात “तयारी स्पर्धा परीक्षांची”या व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ  प्राध्यापक के. एल. गिरमकर, प्रा. गणेश देशमुख डॉ. संतोष पगारे,डॉ. संजय अरगडे, डॉ. सुनील कुटे, डॉ. रवींद्र जाधव व डॉ. वसुदेव साळुंके उपस्थित होते. श्री. नाईकवाडे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून विक्रीकर अधिकारी (STI) या पदावर निवड झाली आहे. ते महाविद्यालयच्या वाणिज्य शाखेचे माजी विद्यार्थी असून बेसबॉल या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत.
जाहिरात
जाहिरात
“अधिकारी म्हणून माझ्या जडणघडणी मध्ये महाविद्यालयातील क्रीडा विभाग वाणिज्य विभाग व स्पर्धा परीक्षा विभाग यांचे भरीव योगदान आहे.” असेही गौरवोदगार त्यांनी याप्रसंगी काढले.
“स्वतःच्या क्षमतांना ओळखले तर स्पर्धापरीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी होणार.”असे प्रतिपादन महाविद्यालयाचे कलाशाखा प्रमुख डॉ. के. एल.गिरमकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले. आपल्या प्रास्तविकात डॉ. वसुदेव साळुंके यांनी महाविद्यालयातील पोलीस व सैन्य भरती कार्यशाळा, MPSC  व्याख्यानमाला या उपक्रमांची माहिती दिली व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.डॉ. सुनील कुटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संपूर्ण कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ.संजय अरगडे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार डॉ. रवींद्र जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. बी. एस. यादव, प्रबंधक  डॉ. अभिजित नाईकवाडे,को. ता. ए. सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे