आरोग्य व शिक्षण

के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी रोहन यादव यांची अविष्कार विद्यापीठस्तर संशोधन स्पर्धेत निवड

के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी रोहन यादव यांची अविष्कार विद्यापीठस्तर संशोधन स्पर्धेत निवड

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगांव:  स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी रोहन यादव यांची नुकतीच ‘अविष्कार २०२२-२३ विद्यापीठस्तर संशोधन स्पर्धेत’ निवड झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित अविष्कार ही संशोधन क्षेत्रातील एक दर्जेदार स्पर्धा मानली जाते. शै. वर्ष २०२२-२३ मध्ये आयोजित या स्पर्धेत विभागिय स्तरावरील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी रोहन यादव यांची निवड झाली आहे. अविष्कार या संशोधनपरक उपक्रमाची अंतिम स्पर्धा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे दि.१३ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. यापूर्वी ही रोहन याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अविष्कार २०१७ मध्ये विभागीय पोष्टर प्रस्तुतिकरणामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला होता. तसेच रोहनने ‘सोलर पॉवर अल्टासोनिक हानीबी पेस्ट रिप्ल्याट डीवाइस’ या विषयावर महाविद्यालयाला पहिले पेटेंट मिळवुन दिले आहे. या पेटेंटच्या माध्यमातून मधमाशी पालन व्यवसायावर व मधमाश्यांवर होणाऱ्या वाईट परिणामावर आळा बसण्यास मदत होणार आहे. रोहन हा महाविद्यालयातील बी.एस्सी व एम.एस्सी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारा विद्यार्थी असुन सध्या तो प्राणीशास्त्र विभागात पीएचडी चे शोधकार्य पूर्ण करत आहे. रोहन याचे आतापर्यंत अनेक रिसर्च पेपर प्रकाशित झालेले असुन त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे ‘इन जिनियस पर्सनॅलिटी पुरस्कार’ प्राप्त झालेला आहे. तसेच मॅचेस्टर युनिव्हर्सिटी लंडन या विद्यापीठाने त्याला संशोधन कार्यासाठी आंमत्रित केलेले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण 20 पेक्षाही अधिक सेमिनार मध्ये त्याने शोधप्रपत्राचे वाचन व सहभाग नोंदविलेला आहे. त्याने मिळविलेल्या या अद्भुतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. मा. संजिवदादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी रोहनचे अभिनंदन केले. अविष्कार २०२२-२३ या स्पर्धेत विद्यापीठ स्तरावर झालेल्या या निवडीबद्दल कोपरगांव पंचक्रोशीतुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
जाहिरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे