आरोग्य व शिक्षण

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत मी साने गुरुजी बोलतोय -अभिवाचन कार्यक्रम संपन्न

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत मी साने गुरुजी बोलतोय -अभिवाचन कार्यक्रम संपन्न

शाळांमधुन संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी सानेगुरुजीचे शाम ची आई पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव – श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात कोपरगांवतील येथील सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ प्रतिष्ठानचे वतीने ‘ मी साने गुरुजी बोलतोय ‘ या अभिवाचन कार्यक्रम शेवगांव येथिल बाळासाहेब भारदे विदयालयांतील येथिल श्री.ऊमेश घेवारीकर यांनी केले.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील येथील कार्यक्रमात अभिवाचन करताना ते म्हणाले की कोरोना नंतर मुलां मधील कार्यक्षमतेवर परिणाम झाला असुन त्यामुळे ती रागिट,आक्रमक बनली आहे.या मुलांमधील हरवत चाललेल्या सुसंस्कार पुन्हा जागविला पाहिजे, वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी साने गुरुजी संस्कार माला रूजविणयासाठी असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत.ते म्हणाले या साठी या विदयालयांने सुरु केलेला साने गुरुजीचे शामची आई च्या पुस्तकांचे वाचन प्रकल्प आदर्श ठरेल.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले.सुत्रसंचालन श्री. सुरेश गोरे यांनी केले. आभार श्री.रघुनाथ लकारे यांनी मानले.या प्रसंगी सावित्री बाई फुले ज्ञानपीठ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.संगिता ताई मालकर, उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड,पर्यवेक्षक श्रीमती उमा रायते,साहित्यिक हेमचंद्र भवर,शिक्षक वृंद ,विदयार्थी आदि उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात
जाहिराती
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे