देश-विदेश
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या स्विकृत संचालकपदी निवड
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या स्विकृत संचालकपदी निवड
कोपरगांव :- येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांची देशपातळीवर साखर उद्योगात सलग्न व मार्गदर्शन करीत असलेल्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) पुणे च्या गव्हर्निंग कौन्सीलचे स्वीकृत संचालक म्हणून निवड झाली आहे. श्री. बाजीराव जी. सुतार यांच्या निवडीबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव व सर्व संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
.


श्री. बाजीराव जी. सुतार हे गेल्या ३६ वर्षापासुन सहकारी साखर कारखानदारीत काम करीत असून त्यांनी वसंतदादा सहकारी साखर कारखाना (सांगली) येथे २० वर्षे, तात्यासाहेब कोरे (वारणा) येथे १० वर्षे, कर्मयोगी शंकरराव पाटील (इंदापूर) येथे ५ वर्षे व गेल्या दीड वर्षापासुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सहजानंदनगर (कोपरगांव) येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत देशाचे व महाराष्ट्र राज्याचे नेते स्व. वसंतदादा पाटील व माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या सानिध्यातील कामाच्या परिसस्पर्शामुळे श्री. बाजीराव जी. सुतार हे सहकारी साखर कारखानदारीत प्रभावीपणे काम करत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या सहकारी क्षेत्रातील साखर कारखानदारी व उप प्रकल्पातील प्रशासकीय, आर्थिक, तांत्रिक तसेच आंतरराष्ट्रीय साखर विक्री संदर्भातील प्रदीर्घ अनुभव विचारात घेवुन डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष एस. एस. शिरगांवकर, एम. के. पटेल, एस डी. बोखारे, व गव्हर्निंग कौन्सीलचे संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी श्री. बाजीराव जी. सुतार यांची एकमताने स्वीकृत संचालक म्हणून निवड केली आहे. श्री. बाजीराव जी. सुतार यांना साखर कारखानदारीतील कामगिरीबददल यापुर्वी २०१३ मध्ये सहकार भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.



