आरोग्य व शिक्षण

गाडगे महाराजांना श्रमदानातून अभिवादन करण्याचा उपक्रम प्रेरणादायी :दिलीप वारकर 

कोपरगाव तालुक्यातील वारी येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त श्रमदानातून अभिवादन करण्यात आले

गाडगे महाराजांना श्रमदानातून अभिवादन करण्याचा उपक्रम प्रेरणादायी :दिलीप वारकर 

जयंतीनिमित्त वारीतील स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

कोपरगाव : गावोगावी जाऊन लोकांची गटारं साफ करुन त्यांना स्वच्छतेचे महत्व शिकवून संत गाडगे महाराजांनी स्वातंत्र्यापूर्वीपासूनच जनजागृतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्याच प्रेरणेतून वारीगावातील स्वच्छताप्रेमी गेली ५० आठवडे अखंडीतपणे प्रत्येक रविवारी गावात चार ते पाच तास श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवीत आहेत, हे निश्चित कौतुकास्पद आहे. याहीपेक्षा संत गाडगे महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ५१ व्या आठवड्यात संपूर्ण गावाची स्वच्छता करून संत गाडगे महाराजांना अभिवादन करण्याचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे वारी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर यांनी म्हंटले आहे.

      

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय, जय बाबाजी भक्त परिवार व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाश्रमदानातून गेली ५० आठवडे अखंडितपणे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. गुरुवारी ( दि.२३ ) राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ५१ व्या सप्ताहातून गावातील प्रमुख व अंतर्गत रस्ते, शाळा, ग्रामपंचायत, बँक, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह सर्वच सार्वजनिक ठिकाणी सकाळी ६ ते १० या वेळेत विशेष स्वच्छता अभियान राबवून शेवटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  या स्वच्छता अभियानात ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, माजी सरपंच सतीश कानडे, स्वच्छतादूत मधुकर टेके, रावसाहेब जगताप, मदन काबरा, नरेंद्र ललवाणी, पत्रकार रोहित टेके, पंडित लकारे, रवींद्र टेके, ज्ञानेश्वर जाधव, नवनाथ कवडे, पोस्टमास्तर संजय कवाडे, कोतवाल संदीप गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी सतीश गायकवाड, रावसाहेब वाघ, चेतन वाळूंज, मनोज जगधने, मच्छिंद्र गागरे, शेषराव रगडे, नंदा महिरे, उषा बागूल यांच्यासह ग्रामस्थांनी श्रमदान केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे