कृषीवार्ता

अकरा गावातील उर्वरित सर्वच रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार – आ. आशुतोष काळे

मतदार संघातील राहाता तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर.

अकरा गावातील उर्वरित सर्वच रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार – आ. आशुतोष काळे

कोपरगाव :- राहाता तालुक्यातील अकरा गावांचा समावेश २००९ साली कोपरगाव विधानसभा मतदार संघात करण्यात आला. या अकरा गावातील सुज्ञ मतदारांनी आमदार अशोकराव काळे यांना भरभरून मताधिक्य दिल्यामुळे ते पुन्हा आमदार झाले. या ऋणातून उतराई होण्यासाठी विकास निधीच्या बाबतीत कोपरगाव तालुक्याप्रमाणे या अकरा गावांना देखील समसमान निधी देवून त्यांनी विकासाचे प्रश्न मार्गी लावले. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मागील साडे तीन वर्षात अकरा गावातील विकास कामांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला असून या पुढील काळात देखील नागरिकांच्या मागणीनुसार उर्वरित सर्वच रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

 कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील जळगाव येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या राहाता चितळी रोड, ग्रा.मा. ६३ ते शिवाजीराव साबदे घर रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भुमीपूजन आणि २० लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या कानिफनाथजी अमोलिक घर ते जयवंतजी वैराळ घर रस्ता डांबरीकरण करणे, पोपटराव चोथमल घर ते ज्ञानदेवजी वैराळ घर रस्ता डांबरीकरण करणे व ग्रामपंचायत अंतर्गत ११ लक्ष ४० हजार रुपये निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मागील काही वर्षापासून कालवे व वितरिका दुरुस्तीची कामे झालेली नव्हती. त्यामुळे आवर्तन काळात अडचणी येवून त्याचा परिणाम आवर्तनावर होत होता. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील यांच्याकडून कालवे दुरुस्तीसाठी ३०० कोटी निधीला मंजुरी मिळवली असून दरवर्षी १०० कोटी रुपये निधीतून कालव्यांची दुरुस्ती होणार आहे. आजपर्यंत ८४ कोटीचे प्रस्ताव दाखल केले असून त्यापैकी ५५ कोटीच्या कामाचे कालवे व वितरिका दुरुस्तीचे कार्यारंभ आदेश देण्यात येवून वितरिका दुरुस्तींची काही कामे पूर्ण झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाला चालू आवर्तन सोडता आले नाही. उन्हाची तीव्रता सतत वाढत असल्यामुळे यापुढील दोन आवर्तन सलग होणार आहे. फळ बागा, चारा पिकांना देखील पाणी मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाणी मागणी नोंदवावी असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.यावेळी अण्णासाहेब चौधरी, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुरलीधर थोरात, सरपंच शिवाजी साबदे, उपसरपंच सौ. कल्पना चौधरी, मुरलीधर शेळके, शंकरराव चौधरी, अण्णासाहेब कोते, दिलीप चौधरी, अनिल रक्टे, शंकरबाबा लहारे, बाबासाहेब चौधरी, सोपानकाका वाघ, पंडितराव चौधरी, रावसाहेब ताके, जबाजी चौधरी, ग्रामपंचायत सदस्या सौ. जया चौधरी, सौ. पुष्पा औताडे, सौ. शोभा आदमाने, नंदू गायकवाड, रेवननाथ वाघ, दीपक वाघ, रविंद्र गायकवाड, नितीन वाकचौरे, सुरेश वाघ, महेश जाधव, राजेंद्र कोते, अमोल शेळके, नवनाथ शेळके, निलेश लहारे, जालिंदर कोते, भाऊसाहेब लहारे, विनायक देठे, विजय सदाफळ, अशोकराव काळे, सुरेश औताडे, किरण चौधरी, महेश औताडे, गोरक्षनाथ जोशी, एल.आर. गायकवाड, मच्छिन्द्र चौधरी, राजेंद्र चौधरी, विष्णु औताडे, अनिल कोते, बाळासाहेब चौधरी, अरुण गायकवाड, दयानंद गायकवाड, आप्पासाहेब कापसे, गणेश एलम, प्रसाद गलांडे, श्री खरात, मंडलाधिकारी सौ. कावेरी आदिक, तलाठी सौ. साळवे, ग्रामविकास अधिकारी सौ. रुक्मिणी सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे