देश-विदेश

ताज हॉटेल आणि आम्ही :-संजय मिसाळ

ताज हॉटेल आणि आम्ही :-संजय मिसाळ
माजीमंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या वाहनाचे आपण सारथी होतो. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या विस्तारीकरणा बरोबरच विविध रासायनीक आसवनी, बायोगैस, सहवीज निर्मीती, इथेनॉल, आदि प्रकल्पांची आधुनिक उभारणी जोरात सुरू होती. त्यासाठी मुंबई – दिल्ली आदि ठिकाणी प्रवास सुरु असायचा. एके दिवशी मुंबईला जात असतांना कसारा घाटात घाटणदेवी आसपास रस्त्यात अचानक बैलगाडीवाला आला, वेग ब-यापैकी होता. गाडी एकदम कट्रोल केली तर शंकरराव कोल्हे साहेब यांचे काय होणार, असे सारे चक्र फिरत होते. बैलगाडीवाल्याला वाचवून आमचे वाहन दुरवर जाऊन थांबले; अपघात थोडक्यात टाळला, परमेश्वराची लीला. साहेबांनी मला विचारले संजु, ए संजु तु बरा आहे का? मी म्हणालो ठिक आहे. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. बिपीनदादा कोल्हे यांनी ताबडतोब आमची चौकशी केली. घाटणदेवी जवळ आलो नमस्कार केला. विघ्न टळलं म्हणून श्रीफळ अर्पण केले,. अन पुढच्या प्रवासाला निघालो. हॉटेल ताज (मुंबई) येथे राज्यातील सर्व साखर कारखान्याच्या अध्यक्षांचा कार्यक्रम होता पंचतारांकित हॉटेल असल्यामुळे मोजक्याच व्यक्तीना आत प्रवेश होता. शंकररावजी कोल्हे साहेबांना कार्यक्रमस्थळी सोडवून आम्ही वाहन पार्किंग जवळ आलो. शंकरराव कोल्हे साहेब यांनी त्यांचे कामानिमित्त माझे सहकारी योगेश गोरडे, संजय मिसाळ यांना बोलवा., त्यावेळी संजय मिसाळ यांचे नवनाथ पारायण सुरु असल्यामुळे त्यांचे पायात चप्पल नसायची. योगेश गोरडेही अत्यंत साध्या पेहरावात. रिसेप्शनला शंकररावजी कोल्हे साहेबांनी फोन केला. सहकाऱ्यांना हॉटेलमध्ये अमुकठिकाणी पाठवा. आम्ही दोघे गेलो पण हॉटेल पंचतारांकित असल्याने आम्हांला प्रवेशाची परवानगी मिळेना, तिकडे साहेब सारखे म्हणायचे माझे सहकारी का येईना. शेवटी रिसेप्शन आरावाल्यांनी सांगितले आम्ही त्या दोघांना आत सोडणार नाही, त्यावर कोल्हे साहेब म्हणाले, मी पण परत चाललो. हो ना करता करता वाद उग्र स्थितीत पोहोचला. हॉटेल ताज (मुंबई) व्यवस्थापन म्हणाले आमचेही काही नियम आहे. त्यावर साहेब म्हणाले त्या दोघांना प्रवेश नाही तर मी पण परत कोपरगावला निघून चाललो असे ते म्हणाले शेवटी एक तासानंतर ताज हॉटेलचे व्यवस्थापन नरमले, आम्हा दोघांना प्रवेश मिळाला. यावरून साहेब सारथींची थेट काळजी घेत यातच समाधान होते.
संजय मिसाळ, दहिगांव बोलका ,
योगेश गोर्डे, विघनवाडी सिन्नर
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे