देश-विदेश

जलसाक्षरता: काळाची गरज

जलसाक्षरता: काळाची गरज
दरवर्षी 22 मार्चला जागतिक जल दिन साजरा केला जातो, त्याचे औचित्य साधून प्रतिवर्षी 16 मार्च ते 22 मार्च हा सप्ताह संपूर्ण राज्यात जलजागृती सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने….
———————————————-
 जे लोक पाण्याचा विचार करत असतात,ते लोक जीवनाचाही विचार करताना दिसतात. म्हणूनच पाणी हे जीवन आहे. पाण्याला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी जर कमी पडू लागले तर काय होईल? याचा प्रत्येक व्यक्तीने विचार करणे आज अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या लोकांना पाण्याचे महत्व व पाण्याबद्दल ज्ञान कमी आहे. असे मला वाटते, काही लोक पाणी शिळे झाले म्हणून दुसऱ्या दिवशी फेकून देतात. नालीत सोडतात त्यांना पाण्याचे महत्व कळाले नाही त्यासाठीच हा लेखन प्रपंच…. पाणी ही एक नैसर्गिक व राष्ट्रीय संपत्ती आहे. पाण्यावरची मालकी सर्व समाजातील लोकांची व देशाची आहे, म्हणून धरणे बांधणे, पाणलोट क्षेत्राचा विकास करणे ,
पाणी आडवणे पाणी जिरवणे,
शेततळ्यात पाणी साठविणे, विहिरी खोदून पाणी साठविणे ,अशा प्रकारचे उपाय करून पाणी साठवून ठेवून भविष्यात त्याचा उपयोग करता येतो. बागबगीचे, शेती यांना तुषार सिंचन व ठिबक सिंचन वापरून पाणी द्यावे, तेव्हा काही प्रमाणात पाण्याची बचत होईल, औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी वापरताना काळजी घ्यावी. पाणी वाया जाऊ नये . जल व्यवस्थापनासाठी समाजात प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे, मानवाने पाणी दाढी करण्यापासून ते पाय धुण्यापर्यंत जपून वापरले तर लाखो लिटर पाण्याची बचत होते. आपल्याला उपलब्ध पाण्यापैकी 97 टक्के पाणी समुद्रात आहे, दोन टक्के पाणी हिमनद्या व ध्रुवीय प्रदेशात आहे. मानवाला पिण्यासाठी पाणी फक्त एक टक्का शुद्ध व निर्मळ आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे. जल व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठानने यांनी पुढे आले पाहिजे .पाणी बचत, जल साक्षरता ,जल प्रदूषण या गोष्टी केवळ कायदे व नियमाने साध्य होणाऱ्या नाहीत, तर त्यासाठी स्वतःपासून जागृती करून उपक्रमात सहभागी व्हावे लागते जे व्यवस्थापन करताना सर्वच पातळीवर लोकांचे प्रबोधन करावे .लोकांनी आपल्या मानसिकतेत बदल करून बदल घडून आणणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याला पाणीटंचाईने काही वर्षांपूर्वी ग्रासले होते तेथे रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला हे भूषण नाही, पाण्याचा मर्यादित वापर करून आपल्या भावी पिढीसाठी उरलेला साठा जपून ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. बऱ्याच व्यक्तींना पाणी प्रश्न हा शासनाचा आहे असा गोड गैरसमज आहे जलसंपदा, जलसंधारण या खात्याने पाणी प्रश्न सोडवावा असे त्यांना वाटते, प्रत्येक नागरिकांनी पाण्याची बचत करावी, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नये, शासनाच्या प्रत्येक योजनेला नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे तेव्हा ती योजना यशस्वी होते.
भारतात महाराष्ट्र  हे पहिले राज्य आहे,ज्यांनी पाणी साक्षरतेचे काम सुरू केले. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना करून पाण्याचे महत्व वेगवेगळ्या अभियानातून व अभिनयातून  प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दाखविले आहे. आज सुद्धा ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन दोन  ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागते, आपला देश आज अमृत महोत्सव वर्षात पदार्पण केलेला आहे परंतु ग्रामीण भागात आजही पाणी, वीज, रस्ते तिथपर्यंत पोहोचलेले नाहीत, आपण कोणत्याही गोष्टी कागदावर मोजून किंवा साक्षर होऊन चालत नाही, तर त्या प्रत्यक्ष कृतीतून घडवाव्या लागतात म्हणून सर्वांनी पाणी जपून वापरा. पाण्याची नियोजन करा, येणारा काळ आपल्या साठी धोकादायक आहे ,म्हणून पाण्याचे महत्व ओळखा, त्यासाठी वृक्ष लावा. शासनाकडून अनेक योजना चालू झाल्या आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आपणही सहकार्य केलेच पाहिजे.काही घोषवाक्य पुढील  प्रमाणे सांगता येतील,
1) *दुष्काळाची नको असेल आपत्ती । तर वेळीचं जपा जलसंपत्ती*
2) *बचत पाण्याची।गरज काळाची* 3 ) *पाण्याचे पुनर्भरण।जीवनाचे संवर्धन* ,4) *पाण्याचे संरक्षण ।वसुंधरेचे करा रक्षण*
*वाणी आणि पाणी जपून वापरा* महाराष्ट्र शासनाने यशदा पुणे येथे जलसाक्षरता केंद्राचे स्थापना केली आहे या चळवळीत कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्फूर्ती व प्रेरणा मिळण्यासाठी त्यांना जलसेवक,जलप्रेमी,जलनायक, जलयोद्धा, जलकर्मी असे संबोधण्यात येत आहे,.
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी  ता. मुखेड
.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे