देश-विदेश

जागतिक ग्रंथ दिना निमित्त बाल-कुमार-ज्ञानकोपरा हा कार्यक्रम कोपरगाव शहरातील र.म.परिख ग्रंथालयामध्ये साजरा.

जागतिक ग्रंथ दिना निमित्त बाल-कुमार-ज्ञानकोपरा हा कार्यक्रम कोपरगाव शहरातील र.म.परिख ग्रंथालयामध्ये साजरा.

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव:-प्रतिनिधी कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इनडोअर गेम हॉल प्रांगणात र.म.परीख सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात जागतिक ग्रंथ दिना निमित्ताने बाल कुमार ज्ञान कोपरा हा उपक्रम मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला.लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कुल मधील शिक्षिका पल्लवी आरणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका व शहरातील विविध भागातील बाल गोपाळ विद्यार्थ्यांनी हजेरी लावून या कार्यक्रमात आपली हजेरी लावली.साध्याच्या आधुनिक जगात मुलांचे वाचन सांस्कृती कडे दुर्लक्ष होत असून भारतीय प्राचीन ग्रंथ व साहित्य परंपरा ही युवा वर्गाकडून दुर्लक्षित होत असल्या कारणाने विद्यार्थ्यां मध्ये वाचन चळवळ लहान वयातच राबविण्याचा हा प्रकल्प निश्चित वाचन संस्कृती ला बळकटीला प्रेरणा देणारा आहे.म्हणून बाल विद्यार्थ्यां साठी ग्रंथालयाच्या वतीने शाळेच्या उन्हाळी सुट्टी निमित्त मोफत बाल साहित्य व इतर पुस्तस्के वाचनासाठी उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे.ही संकल्पना कोपरगाव तालुक्यात सर्व ग्रामीण व शहरातील सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालया मध्ये राबविला तर निश्चितच याचे चांगले दूरगामी परिणाम दिसतील अशी भावना सर्व सामान्य वाचक प्रेमी नागरिकांत होत आहे.या कार्यक्रमाचे आयोजन र.म.परिख सार्वजनिक ग्रंथालय व वाचनायचे कार्याध्यक्ष श्री.पद्मकांत कुदळे,श्री. गोरे सर तसेच ग्रंथपाल श्री.योगेश कोळगे व सहाय्यक श्री.प्रमोद येवले यांनी केले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे