के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा संपन्न
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा संपन्न
कोपरगाव: के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे नुकतीच विद्यार्थिनींसाठी सक्षमीकरण, कायदेविषयक जाणीव जागृती कार्यशाळा व समुपदेशन सत्र संपन्न झाले. यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी कोपरगाव पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या उपस्थित होत्या. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींसोबत शिक्षिकाही उपस्थित होत्या.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती बालवे यांनी केले. या कार्यक्रमामागची भूमिका, अश्या समुपदेशन सत्रांची असलेली आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली व या अनुषंगाने महाविद्यालय राबवित असलेले उपक्रम विषद केले.

यावेळी बोलताना उपनिरीक्षक मुकणे म्हणाल्या, की मुलींनी आज सशक्त होणे गरजेचे आहे. मुलींनी आपले आरोग्य सांभाळले पाहिजे त्यासोबत मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. महिला व मुलींसाठी असलेले कायदे व सुविधा या जाणून घेतल्या पाहिजे. यावेळी अनेक मुलींनी श्रीमती मुकणे यांना विविध प्रश्न विचारले. त्याला प्रतिसाद देत त्यांनी सर्व विद्यार्थिनींना समर्पक उत्तरे दिली व त्यांच्या शंकांचे निरसन केले.

यावेळी श्रीमती मुकणे यांचा सत्कार प्रा. मयुरी भोसले यांनी केला. यावेळी प्रा. यास्मिन शेख, प्रा. सायली वायखिंडे, प्रा. श्रावणी आढाव आदी शिक्षिका उपस्थित होत्या.





