आरोग्य व शिक्षण

हजयात्रेवर जाणाऱ्या भाविकांचे येत्या दिनांक ३१ मे रोजी होणार हज वेटिंग नंबरचे व्हॅक्सिनेशन

हजयात्रेवर जाणाऱ्या भाविकांचे येत्या दिनांक ३१ मे रोजी होणार हज वेटिंग नंबरचे व्हॅक्सिनेशन

श्रीरामपूर प्रतिनिधी:हजयात्रेवर जाणाऱ्या भाविकांचे येत्या ३१ मे २०२३ रोजी हज कमिटी ऑफ इंडिया यांच्या वेटिंग नंबरचे व्हॅक्सिनेशन जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) अहमदनगर याठिकाणी होणार आहे, वेटींग नंबरवर असलेल्या सर्व हज यात्रेकरू भाविकांनी व्हॅक्सिनेशन घेणे बंधनकारक आहे, तरी सर्व वेटींग नंबरवर असलेल्या हज यात्राकरु भाविकांनी दिनांक ३१ मे २०२३ रोजी (सकाळी ८:३० ते दुपारी १२:३० या वेळेत) अहमदनगरला व्हेक्सिनेशनसाठी येताना आपल्यासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे बरोबर घेऊन यावीत असे सोहेलभाई दारुवाला यांच्याकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आवाहनही करण्यात आले आहे.
१) ओरिजिनल आधारकार्ड व त्याची झेरॉक्स प्रत.
२) कव्हर नंबर आणि वेटिंग नंबरची झेरॉक्स प्रत.
३) करोना लसीकरण प्रमाणपत्र,
४) काही मोठा आजार असल्यास शुगर /हार्ट /बीपी किंवा अन्य काही औषधोपचार सुरु असल्यास डॉक्टरांचे प्रमाणपत्र किंवा चिठ्ठी व गोळ्या – औषधे बरोबर घेऊन येणे.
५) दोन पासपोर्ट साईज फोटो,
६) पासपोर्ट च्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
बरोबर आणावी असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
काही आवश्यकता भासल्यास
हाजी अब्दुस सलामभाई, सलीमभाई बागवान,बाबा हाजी सहाब,अलीसभाई सय्यद,
,इम्रानभाई जहागीरदार,
यांच्याशी संपर्क साधावा, सदरील व्हिक्सिनेशन हे अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरातील नर्सिंग कॉलेज याठिकाणी होणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील प्रमाणे संपर्क साधावा.
सोहेलभाई दारूवाला – 8698989894,
नासिर भाई- 9422227868, तौसिफ ट्रेनर-98348 63484, असेही शेवटी प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे