आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आत्मा मालिक हॉस्पिटल येथे सवलतीच्या दरात उपचार
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आत्मा मालिक हॉस्पिटल येथे सवलतीच्या दरात उपचार
आत्मा मालिक ध्यानपिठाची ची आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना 2023-24 खास पालकांसाठी….….
संपादक:- रविंद्र जगताप
माननीय अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट माननीय सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे साहेब विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना 2023-24 चा विस्तार आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी वाढवण्यात आलेला आहे यांतर्गत पालकांसाठी नव्या सुविधा सह सुरू झालेल्या आत्मा मालिक हॉस्पिटल येथे सवलतीच्या दरात उपचार केले जाणार .तसेच या अंतर्गत पालकांसाठी मोफत हेल्थ चेकअपची देखील सुविधा आत्मा मालिक हॉस्पिटल येथे देण्यात येणार आहे दिनांक 22-7-23 आलेल्या पालक भेटी दरम्यान पालकांचे आरोग्य सुरक्षा योजनेचा फॉर्म भरून घेण्याचा उपक्रम पार पाडण्यात आला. या उपक्रमाला आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शैक्षणिक व वस्तीगृह व्यवस्थापन विभाग व आत्मा मालिक हॉस्पिटल व्यवस्थापनाचा मोलाचा सहभाग लाभला उपक्रमाला साथ देत पालकांनी आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये नियोजित केलेल्या मोफत हेल्थ चेक अप सुविधाचा लाभ मोठ्या संख्येने घेतला तसेच अत्याधुनिक सुविधांसह चालू असलेल्या आत्मा मालिक हॉस्पिटलची पाहणी देखील पालकांनी केली……
आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना 2023- 24 अधिक माहितीसाठी संपर्क-: 9156033221(अक्षय कंड्रे)
PRO (AMASY)




