कृषीवार्ता

दहा वीज उपकेंद्रातील शेतक-यांना पुर्ण दाबाने वीजेसाठी केंद्राकडे पाठपुरावा-सौ स्नेहलताताई कोल्हे

दहा वीज उपकेंद्रातील शेतक-यांना पुर्ण दाबाने वीजेसाठी केंद्राकडे पाठपुरावा-सौ स्नेहलताताई कोल्हे

संपादक:-रविंद्र जगताप
 कोपरगाव :-     कोपरगांव विधानसभा मतदार संघातील वारी, दहेगांव बोलका, रवंदे, कोळपेवाडी, चासनळी, कुंभारी, येसगांव, करंजी, संवत्सर आणि तळेगांवमळे या दहा वीज उपकेंद्रातील शेतक-यांना पुर्ण दाबाने वीज मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या वीज वितरण प्रणाली (आर डी एस एस) योजनेत पाठपुरावा करण्यांत आला असुन ही कामे लवकरच निवीदास्तरावर सध्या कार्यरत असल्याची माहिती भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली  त्या पुढे म्हणाल्या की, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील वीजेच्या प्रलंबित समस्याबाबत गेल्या पाच वर्षात एक कृतीबध्द आराखडा तयार करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यांत येत होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यास्तरावर सदर दहा वीज उपकेंद्रातील वीजेच्या समस्या कमी होवुन शेतक-यांना पुर्ण दाबाने वीज मिळावी म्हणून मागणी होती त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सर्व मंत्रीमंडळाने वीज वितरण प्रणाली संदर्भात राज्यासाठी आर डी एस एस योजना तयार केली त्याबाबत संजीवनी कार्यस्थळावर बिपीनदादा कोल्हे यांनी सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, नाशिक वीज मंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, संगमनेरचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात व कोपरगाव वीज वितरण कंपनीचे सर्व अधिकारी यांच्याशी चर्चा करून प्राधान्याने करावयाच्या कामाबाबत नियोजन केले.
जाहिरात
जाहिरात
 त्याचप्रमाणे आपेगांव येथे नविन वीज फिडर बसविण्यांत येवुन १६ गावांसाठी गांवठाण वीज वितरणाबाबत काम हाती घेवुन येसगांव खिर्डीगणेश वीजेचा अतिरिक्त दाब नाटेगांव उपकेंद्रावर, रवंदे मधुन धामोरी, चासनळीतून बक्तरपुर, दहेगांव बोलकातुन कासली वीजभार स्वतंत्र करून येथील शेतक-यांसह वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा कसा होईल याबाबतही चर्चा करण्यांत येवुन त्याबाबत उपकार्यकारी अभियंता श्री. राठोड यांना सुचना देण्यांत आल्या आहेत. देशात आणि राज्यात एकच सत्ता असल्याने वीज समस्यांचे प्रश्न मार्गी लागून त्यासाठी पुर्ण क्षमतेने निधी मिळेल त्याचबरोबर पुढच्या दहा वर्षासाठी वाढत्या नागरीकीकरण व औद्योगिकीकरणासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबतही आराखडा तयार व्हावा अशी अपेक्षा सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी शेवटी व्यक्त केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे