महाराष्ट्र

वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालकांना मार्गदर्शन करताना Api घुले मॅडम

वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालकांना मार्गदर्शन करताना Api घुले मॅडम

वैजापूर प्रतिनिधी विजय त्रिभुवन

आज दि.31/08/2023 रोजी NH753 f औरंगाबाद जळगाव महामार्गावर सावंगी टोलवर मा.अपर पोलीस महासंचालक साहेब (वा) महाराष्ट्र राज्य मुंबई,मा. पोलीस अधिक्षक महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, औरंगाबाद मा.पोलीस उप अधिक्षक प्रादेशिक विभाग औरंगाबाद . मा.पोलीस निरीक्षक औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली वाहनचालकांना मार्गदर्शन करून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.सदर वेळी खालील प्रमाणे वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा.
गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.ट्रिपल सिट प्रवास करु नये.दारू पिवून वाहन चालवू नये.मो.सायकल चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा वाहन चालवताना नेहमी वेगमर्यादा चे पालन करावे नेहमी ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने करावे.विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे.
चारचाकी वाहन चालवताना चालक तसेच सर्वच प्रवाशांनी सीटबेल्ट वापरावे.
मोटर सायकल चालवताना नेहमी सर्व्हिस रोड चा वापर करावा ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसेल त्याठिकाणी शोल्डर लेन चा वापर करावा.महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये.वाहन चालवताना समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज घेऊन वाहन चालवावे कारण समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज न आल्याने पाठीमागील वाहनाने समोरील वाहनस धडक दिल्याने घडणाऱ्या अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.महिलांनी टु व्हीलर बसून प्रवास करताना टु साईड सुरक्षितपणे बसावे‌ याबाबत मार्गदर्शन करुन मृत्युंजय दूत संकल्पनेची सविस्तर माहिती Api घुले मॅडम, भरत चव्हाण यांनी दिली

जाहिरात
जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे