धार्मिक

सावळीविहीर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू…….

 

सावळीविहीर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू…....

संपादक:- रविंद्र जगताप

सावळीविहीर/-राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथे सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व स्वामी काशिकानंद याच्या प्रेरणेने सालाबादप्रमाणे यंदाही अतिशय भक्तीमय वातावरणात सुरूवात केली आहे ह.भ.प.अमोल महाराज कोटमे यांचे मार्गदर्शन तर ह.भ.प.शुभम महाराज देवळाणेकर ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक यांचे मोलाचं योगदान आहे गावात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हरिनाम गजरात लाहन थोर मंडळी पंचक्रोशीतील भाविक मोठया भक्तीभावाने सहभागी होत आहे गुरुवार दि.31 ऑगस्ट ते गुरुवार दि.7 संप्टेबर पर्यत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन सोहळा महाप्रसाद सावळीविहीर खुर्द मारुती मंदिर या ठिकाणी आहे या सात दिवसांत प्रवचन किर्तन पारायण हरिपाठ विविध धार्मिक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे समजते ह.भ.प राहुल महाराज डुंमरे किर्तनकार यांनी प्रथम दिवशी हरिनामाच्या गजरात किती शक्ती आहे हे समजून घेण्यासाठी काय करावे नामाने मनूष्य जिंवनात बदल होतो यावर उपदेश केला . तसेच ह.भ.प.संजय महाराज हिंगे यांनी या जगात आपण पाहुणे आहोत जन्माला आला कि मृत्य निश्चित आहे हे सत्य आहे त्यासाठी शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर अंगी अभिमान न बाळगता अंगी नम्रता ठेवून सत्कार्य करा सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वाटचाल केली की माणसांची किर्ती जगभर होण्यास वेळ लागतं नाही असा उपदेश दिला तसेच गायणाचार्य ह.भ.प.आकाश महाराज हिडगे व ह.भ.प .दिपक महाराज मोहन यांनी आपल्या सुमधुर आवाजाने लक्षवेधी ठरतं आहे सावळीविहीर खुर्द निंमशेवडी सोनेंवाडी येथील पंचक्रोशीतील नामांकितभंजनी मंडळ यांचा सहभाग आहे श्री दत्त मंदीर मित्र मंडळ, शेरावाली मित्र मंडळ,विघ्नहर्ता मित्र मंडळ, जंगदबा मित्र मंडळ सावळी विहीर खुर्द ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले आहे ,गावात सप्ताहानिमित्त नवचैतन्य निर्माण झाले असून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहेअखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते विजयराव चव्हाण प्रयत्नशील आहे त्यानी सप्ताहात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे

जाहिरात
जाहिरात

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नाही महाराष्ट्रात राहता का?  पाकिस्तानात ,सविस्तर बातमी खालील लिंक दाबा

https://youtu.be/q1DvsD63HTY?si=fC18GI7GbOV9KtTw

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे