आरोग्य व शिक्षण

के.जे.सोमैया महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

के.जे.सोमैया महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

संपादक:-रविंद्र जगताप

कोपरगांव:  स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक दिनाच्या दिवशी सकाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, विज्ञान शाखाप्रमुख प्रो.(डॉ) बी.बी.भोसले, डॉ. गणेश देशमुख, डॉ. बी.डी.गव्हाणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे व उपस्थित प्राध्यापकांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या कार्याचा गौरव करतांनाच ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असुन आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयातील गणित विभागाच्या वतीनेही विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला. यावेळी गणित विभागातील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विभागप्रमुख डॉ. बी. डी. गव्हाणे यांनी गुरू आणि शिष्य यांच्यातील पावित्र्य कायम ठेवण्‍यासाठी व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो असे सांगितले तसेच भारतात प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा असून शिक्षक हे विद्यार्थ्यांना योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारी सामर्थ्यवान पिढी तयार करण्याचे काम शिक्षकच करत असतात असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जीवनकार्याबद्दल मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी गणित विभागातील प्रा.सोमनाथ उकिर्डे, प्रा.सोमनाथ डुबे, प्रा.सुनिता वर्पे, प्रा.योगिता उगले, प्रा.कल्याणी काळवाघे, प्रा.श्रुतिका गव्हाळे यांच्यासह विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात

वन नेशन व इलेक्शन फायदा तोटा काय आहे सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/zRwW6LaVO2c?si=8_m2XTUFJFhlHLDh

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/KgmXrffhj0F6D04zF6eSoo

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे