जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने नेत्र शिबिर उत्साहात संपन्न
जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने नेत्र शिबिर उत्साहात संपन्न
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव – येथील जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.अहमदनगर येथील श्री आनंद ऋषी हाॅसपिटल यांच्या वतीने व कै. गोकुळचंद रुपचंद कोठारी यांच्या स्मरणार्थ, सौ. चंद्रकला दिनेश कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त, कै. मोतीलाल अमोलचंद शिंगि यांच्या स्मरणार्थ, श्रीमती शकुंतलाबाई मोतीलाल शिंगी परीवाराचया सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.स्वागत व प्रास्ताविक डॉ विलास आचारी यांनी केले कार्याध्यक्ष विजय बंब यांनी उपक्रमाची माहिती दिली उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे होत्या उपस्थित डॉक्टर व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले नेत्र तपासणी शिबिर प्रसंगी शहर व तालुक्यातील दोनशे पेक्षा जास्त रुग्णांना मोफत तपासण्यात आले व विस ते तीस रुग्णांना अहमदनगर येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले शिबिराच्या यशस्वितेसाठी साई गावं पालखी सोहळ्याचे सभासद, मुंबादेवी तरुण मंडळाचे सभासद व जेष्ठ नागरिक सेवा मंचचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सौ. शैलजा रोहोम, सुवालाल भंडारी, ससाणे साहेब, पेंटर महंमद दारुवाला, परसराम भावसार यांच्या सह कोठारी व शिंगी परीवाराचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.





