देश-विदेश

कोपरगाव प्रगल्भ साहित्याची खान – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रगल्भ साहित्याची खान – स्नेहलताताई कोल्हे

कमला दगडे यांच्या पुस्तकाचे कोल्हे यांच्या हस्ते प्रकाशन

संपादक :- रवींद्र जगताप

नुकताच कोपरगाव शहरातील विविध मान्यवरांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात कमला अभय दगडे यांच्या सुबोध एकांकी संग्रह या पुस्तकाचे प्रकाशन मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.विद्या से विद्यासागर या आशयाचे विवेचन असणाऱ्या संग्रहाचे लेखन कमला दगडे यांनी केले.कोपरगाव ही साहित्याची विपुल संपदा असणाऱ्या लेखकांची खान आहे.कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नसून कोपरगाव ही महिला साहित्यिकांचे केंद्र बनेल यात शंका नाही.

जाहिरात

डॉ.अभय दगडे यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक विद्यासागरजी यांचे विचार समाज व्यवस्थेला मार्गदर्शक ठरण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.समाज,मानवता आणि विवेकशील विचार यांचा अचूक मेळ घालण्यासाठी प्रबोधन पुस्तके ही मोलाची भूमिका बजावत असतात.सुबोध एकांकी संग्रह हा कोपरगाव साहित्य संपदेतला मोलाचा ठेवा म्हणून नावाजले जाईल. कमला दगडे यांनी महिला म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना साहित्य लेखनाचा उमटविलेला ठसा हा उल्लेनीय असून त्यांना पुढील वाटचालीसाठी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या.या पुस्तक प्रकाशन प्रसंगी डॉ.रामदास आव्हाड,डॉ.सुषमा आचारी,डॉ.अभय दगडे,राजेश शिंगी,अतुल काले,राजेंद्र ठोळे आदींसह राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,सहकार,ज्येष्ठ नागरिक विचार मंच,विविध समाज मंडळे,व्यापारी महासंघ,विविध संघटना आणि संस्था यांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक,नागरी सत्कार समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे