आरोग्य व शिक्षण

वारीत महाश्रमदानातून परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह 93 वा” उत्साहात संपन्न!

वारीत महाश्रमदानातून परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह 93 वा” उत्साहात संपन्न!

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी, जय बाबाजी भक्त परिवार, वारी व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानांतर्गत रविवारी ( दि. 31 डिसेंबर 2023 ) सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियानाचा 93 वा. सप्ताह यशस्वीपणे राबविण्यात आला.या अभियानात वारीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात संकलित केलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या पेटवून दिल्या.या स्वच्छता अभियानात स्वच्छतादूत मधुकरराव टेके, सेवानिवृत बँक अधिकारी रावसाहेब जगताप, विलास तात्या गाडेकर, वारीचे पोस्ट मास्तर संजय कवाडे, पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य रोहित टेके, माहिती अधिकार कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, विलास जगधने यांनी या अभियानात आपले श्रमरुपी योगदान दिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे