आरोग्य व शिक्षण

सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक १० वी १२ वी गुणवंतांच्या गौरव सोहळ्यासाठी रविवारी कोपरगावात

सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक १० वी १२ वी गुणवंतांच्या गौरव सोहळ्यासाठी रविवारी कोपरगावात

कोपरगाव– कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी एच.एस.सी. व एस.एस.सी. परीक्षा २०२४ मध्ये विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक उपस्थित राहणार असल्याची माहिती कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.

आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी एच.एस.सी. व एस.एस.सी. परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा आयोजित केला जातो. त्याप्रमाणे याहीवर्षी रविवार (दि.०९) रोजी सकाळी १०.०० वा.कृष्णाई बॅक्वेट हॉल कोपरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी मा.आ. अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे,आ.आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन डॉ.मच्छिंद्र बर्डे तसेच सर्व संचालक मंडळ व उद्योग समूहाच्या संलग्न संस्थांचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमासाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/DzDehNA0OXmDtJKrO6Jiim

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे