आरोग्य व शिक्षण

सोमैया महाविद्यालयाच्या कु वर्षा विलास देवकर हिची भारतीय नौदला मध्ये निवड

सोमैया महाविद्यालयाच्या कु वर्षा विलास देवकर हिची भारतीय नौदला मध्ये निवड

कोपरगाव दिनांक:-स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या एन.सी.सी. कॅडेट तसेच विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र विभागाची  विद्यार्थिनी कु. वर्षा विलास देवकर हिची अग्निवीरच्या योजनेमार्फत  भारतीय नौदलामध्ये यशस्वीरीत्या निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या असोसिएट एन. सी. सी. अधिकारी प्रा. वर्षा आहेर म्हणाल्या
” कु. वर्षा देवकर ही गेल्या शैक्षणिक वर्षात ‘सी सर्टिफिकेट’ परीक्षा उत्तीर्ण झाली असून तेव्हापासूनच  भारतीय सेनेमध्ये भरती होण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते.  एन.सी.सी. मध्ये असताना तिने राज्य व राष्ट्रीय स्तरारावरील  अनेक शिबिरांमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला आहे. तसेच दरवर्षी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी पुणे येथे होणाऱ्या निवड शिबिरासाठी (IGC-CAT-1) देखील तिची निवड झाली होती. त्याचवेळी तिने आपला नियमित अभ्यासक्रम देखील उत्तमरीत्या  पूर्ण केला असून इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही सुरू ठेवला आहे. कु. वर्षा देवकर ही अनकाई ता. येवला (नाशिक) येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील असून उच्च शिक्षणासाठी सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून सतत प्रयत्नशील आहे कुमारी देवकर हिचे भारतीय नौदलामध्ये निवड झाल्याबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा अशोक राव रोहमारे सचिव ऍड संजीव कुलकर्णी विश्वस्त मा संदीप राव रोहमारे यांनी विशेष अभिनंदन केले आहे तसेच तिला पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या आहेत.  कु. वर्षा देवकर हिला महाविद्यालयाच्या एन.सी.सी. अधिकारी प्रा. वर्षा आहेर, डॉ. एन.जी. शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे