देश-विदेश

साई शक्ती इंग्लिश मीडियम शाळेत प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

साई शक्ती इंग्लिश मीडियम शाळेत प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कोपरगाव :- दि २६ जानेवारी २०२३- कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल कासली या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे, संस्थेचे रजीस्टार बापूसाहेब डांगे, कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विशाल धारणगावकर, ग्रामविकास अधिकारी सुधाकर पगारे, प्राध्यापक अमृततुल्य चे प्रा योगेश शिंदे यांच्या सह गोविंद शिंदे, संभाजी शिसोदे, शरद ढेपले, प्रकाश शिंदे, गणेश शिंदे, योगेश पाठक, निलेश औटी, शोभा पगारे, अलका शिंदे, जयश्री मांडुडे, कविता शिंदे, वैशाली परजणे आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रजासत्ताक दिनी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर एल.के.जी,यु.के.जी तसेच इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आधारित आपल्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणातून आपले विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली.त्यानंतर “साईशक्ती अविष्कार” या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांच्या संगीतावर ठेका धरत आपल्यातील सुप्त गुणांतून दर्जेदार कलाविष्कार सादर केले. यामध्ये अनेकांनी देशभक्तीपर धार्मिक हिंदी मराठी गाण्यावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली तर अनेक पालकांनी विद्यार्थ्यांवर रोख व वस्तू स्वरूपात बक्षीसाचा पाऊस पाडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन शालेय शिक्षिका सोनाली कापसे, विलास चव्हाण यांनी केले. तसेच सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय जाधव, शिक्षिका सोनाली कापसे, विलास चव्हाण, राजेंद्र आहेर, निलेश देवकर, रेखा दिवे, जाधव आंटी आदींनी अथक परिश्रम घेतले तर शेवटी अनेक पालकांनी आपल्या मनोगतातून चिमुकल्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे