आरोग्य व शिक्षण

काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९२.५०%

काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९२.५०%

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिशचा एस.एस.सी. परीक्षा २०२५ चा शेकडा निकाल ९२.५० एवढा लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी दिली आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेसाठी एकूण ४० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ०७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १० प्रथम श्रेणी, ०९ द्वितीय श्रेणी, तर ११ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी मिळविली आहे. विद्यालयात सर्वाधिक ८६.००% गुण मिळवून कु.इच्छा भाऊसाहेब सोनवणे प्रथम आली आहे. तर साहिल गोरख एलमामे या विद्यार्थ्याने ८१.२० गुण मिळवून द्वितीय व आदित्य धनराज सोनवणे या विद्यार्थ्याने ७९.८० गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

जाहिरात

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे,सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे, सर्व पालक, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6

नगर मनमाड रोडवर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा

https://youtu.be/-_WyxTHcthI?si=XdBcpGLMQKX6_-LR

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे