आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजन

आनंदी वातावरणात प्रवेशोत्सव सोहळा साजरा

आनंदी वातावरणात प्रवेशोत्सव सोहळा साजरा

वैजापूर प्रतिनिधी विजय त्रिभुवन

आज दि . 16 जून 2025 रोजी जि.प .प्रा . शाळा देवडोंगरी विनायकनगर‌ येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रवेशोत्सवाने झाली आजच्या दिवशी नवीन वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प व पाठयपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या . शाळेच्या पहिल्याच दिवशी 90% च्या आसपास विद्यार्थी उपस्थित असणे ही उल्लेखनीय बाब दिसून आली .

जाहिरात

या प्रसंगी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षांकरिता मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या व प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा सुज्ञ व शिक्षण प्रेमी नागरिक यांनी व्यक्त केली यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय त्रिभुवन, उपाध्यक्ष एकनाथ आहेर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी अहिरे मॅडम, शंकर खंडागळे सर, श्रीमती काजल जाधव मॅडम, रवींद्र कोल्हे, पंढरीनाथ आहेर, गुरुदास वाघ, जगन्नाथ कोल्हे, प्रशांत शिंदे, संदिप पठारे, कृष्णा मेटे, चैताली कोठाळे, पूजा आहेर, मोनाली आहेर यांची उपस्थिती होती

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे