आरोग्य व शिक्षण

योग शिक्षिका विमलताई पुंडे यांना ‘Women Health Icon Award’ पुरस्कार

योग शिक्षिका विमलताई पुंडे यांना ‘Women Health Icon Award’ पुरस्कार

कोपरगाव, 10 मार्च 2026: कोपरगाव शहर आणि तालुक्यातील महिला व मुलींच्या आरोग्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून योग शिक्षिका विमलताई पुंडे अखंडपणे योग वर्गाच्या माध्यमातून काम करत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘International Naturopathy Organization, Delhi’ ने त्यांना ‘Women Health Icon Award’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.विमलताई पुंडे शाळांमध्ये जाऊन पौगंडावस्थेतील मुलींमधील शारीरिक आणि मानसिक बदलांवर, तसेच मासिक पाळीच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन करतात. किशोरवयीन मुलींना होणाऱ्या बदलांची समज देण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.महिला दिनाच्या निमित्ताने  या पुरस्कारासाठी अहिल्या नगर जिल्ह्यातून विमलताई पुंडे यांची निवड करण्यात आली आहे. कोपरगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे