आंतरराष्ट्रीय युवादिनानिमित्त पाथफाईंडर इंटरनॅशनल , आरोग्य विभाग व CSRD ISWR अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यशाळा संपन्न


आंतरराष्ट्रीय युवादिनानिमित्त पाथफाईंडर इंटरनॅशनल , आरोग्य विभाग व CSRD ISWR अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यशाळा संपन्न
संपादक :- रविंद्र जगताप
आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवादिनानिमित्त समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसाठी युवा कार्यशाळा पाथफाईंडर इंटरनॅशनल , आरोग्य विभाग व CSRD ISWR अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होती . यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. सुरेश पठारे, प्रा. आसावरी झपके, डॉ. जेमन वर्गीस, प्रा. विजय संसारे,प्रा. प्रदीप जारे , प्रा.सम्युएल वाघमारे व पाथफाईंडर इंटरनॅशनल या संस्थेचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक राहुल वैराट, विनी कांबळे, मेंटॉर, शाम गायकवाड,मोहम्मद इक्बाल उपस्थित होते. यामध्ये युवकांना किशोर वयीन युवांचे लैंगिक पुनुरुत्पादन आरोग्य व अधिकार ,मासिक पाळी, सामाजिक लिंग ,कुटुंब नियोजनाबाबत बाबत माहिती सांगण्यात आली. व पोस्टर सादरीकरणा द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेत सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ. सुरेश पठारे संचालक CSRD ISWR यांनी अशा युवा जागृतीच्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.





